विकासकामांद्वारे महाविकास आघाडीकडून राज्याला पुढे नेण्याचे काम - आदित्य ठाकरे

विकासकामांद्वारे महाविकास आघाडीकडून राज्याला पुढे नेण्याचे काम - आदित्य ठाकरे

विकासकामांद्वारे महाविकास आघाडीकडून राज्याला पुढे नेण्याचे काम - आदित्य ठाकरे


     डोंबिवली ( शंकर जाधव ) विविध विकासकामांच्या माध्यमातून महाविकास आघाडी राज्याला पुढे नेण्याचे काम करीत असल्याचे प्रतिपादन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी कल्याणात केले. कल्याणच्या बहूप्रतिक्षित पत्रीपुलाच्या गर्डर लाँचिंगच्या कामाची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे कल्याणात आले होते. 

   कल्याण डोंबिवलीकरांसाठी पत्रीपुल हा मोठा प्रश्न होता. मात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याने हे काम आता अंतिम टप्प्यात आल्याचे आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले. रेल्वेकडून मेगाब्लॉक मिळाल्यानंतर पत्रीपुलाचे गर्डरचे काम सुरू झाले असून संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारची कामे सुरू आहेत. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये विकासाच्या कामांनी वेग घेतला असून आम्ही राजकारण निवडणुकीपुरता करतो असे सांगत विरोधी पक्षाला टोला लगावला. पत्रीपुलावरून राजकारण झाले असले तरी आम्ही मात्र त्याचे राजकरण करणार नसल्याचेही आदित्य ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.तर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, अनंत अडचणींवर मात करीत पत्रीपुलाचे काम अंतिम टप्प्यामध्ये पोहचले आहे. मात्र येत्या महिन्याभरात या पुलाचे काम पूर्ण करून नागरिकांसाठी खुला होईल. पत्रीपुलाच्या गर्डर लाँचिंगसाठी दोन दिवसांचा  मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.गेल्या दोन वर्षांपासून पत्रीपुलाचे काम सुरू असून त्यामुळे नागरिकांनी प्रचंड त्रास सहन केला आहे. लोकांनी दाखवलेल्या या संयमाचे कौतुक करत अनेक अडचणींवर मात करून या पुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. याचे काम आता अंतिम टप्प्यात आले असून आणखी महिन्याभरात हा पूल नागरिकांसाठी खुला होईल असा विश्वास खासदार डॉ. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला. एम एस आर डी सी मुख्य अभियंता शशिकांत  सोनटक्के म्हणाले, पत्रिपुल गर्डर लौंचिंगच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण ,गर्डर ४०  मीटर पुढे ढकलण्यात यश आले आहे. कल्याण डोंबिवलीकर प्रतीक्षेत असणाऱ्या बहुचर्चित पत्रीपुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून गर्डर लाँचिंगचे पहिल्या टप्प्यातील काम आज यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले. विंच केबल पुश श्रू पद्धतीने ७६  मीटर पैकी आज ४० मीटरपर्यंत हा गर्डर पुढे ढकलण्यात आला. गेल्या  वर्षांपासून या पुलाचे काम सुरू असून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामूळे ते काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. या पुलाच्या गर्डर लाँचिंगसाठी १४ तासांचे मेगाब्लॉक घेण्यात आले असून त्यापैकी पहिला ४  तासांचा मेगाब्लॉक आज संपन्न झाला. अत्याधुनिक अशा विंच केबल पुश श्रू पध्दतीने आज नियोजित केलेल्या ४० मीटर अंतरापर्यंत हा गर्डर हलवण्यात यश आले. यासाठी रेल्वेनेही सर्व मार्गावरील लोकल आणि मेल एक्स्प्रेसची वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. यापैकी उद्या म्हणजे रविवारी तासांचा दुसरा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. उद्याच्या मेगाब्लॉकदरम्यान उर्वरित ३६  मीटर अंतरावर हा

गर्डर ढकलण्यात येणार आहे.

 

 

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

 

 १) टेंडरचे पैसे खाण्यासाठी पुलाची कामे काढली जातात  : मनसे आमदार राजू पाटील यांचा आरोप 

 पत्रिपुलाच्या गर्डर लॉंचिंगचा भव्य सोहळा सत्ताधारी शिवसेनेने आयोजित केला होता मात्र शहरातील इतर पुलांची आणि त्यांना जोडणाऱ्या रस्त्याची कामे रखडलेली असून ही कामे पूर्ण करण्याचे देणेघेणे सत्ताधारी शिवसेनेला पडलेले नाही केवळ टेंडरचे पैसे खाण्यासाठीच पुलांची कामे काढली जात असून त्याना वाहतूक कोंडी आणि जोडरस्ते बाबत काही पडलेली नसून आयुक्त देखील त्यांची री ओढत असतील तर त्यांना जाब विचारावा लागेल असा इशारा मनसे आमदार राजू पाटील यांनी दिला.  पत्रिपुल गर्डर लॉंचिंगचा सोहळा आयोजित करन्यात आला होता. यासाठी पर्यावरणमंत्री शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी भेट दिली त्यांना केलेल्या पुलाचे काम दाखविण्याऐवजी इतर रखडलेल्या पुलांची कामे देखील दाखवा. पत्रिपुल पूर्ण करून वाहतूक कोंडी फुटणार नसून पुलाला जोडणाऱ्या समांतर रोड जवळील जागा शिवसेनेच्या जबाबदार पदाधिकारी आणि माजी महापौर राहिलेल्या व्यक्तीने बळकावली असून मागील महिन्यापासून वाहतूक कोंडी फोडण्यासाठी महत्वाची असलेली ही जागा ताब्यात घेण्यासठी पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत मात्र आद्यपी कारवाई करण्यात आलेली नाही. यामुळे आयुक्तना ही जागा ताब्यात केव्हा घेणार हे  विचारण्यासाठी आलो होतो मात्र आयुक्त ची भेट होऊ शकली नाही आयुक्तनि आता वेळ दिली आहे त्यांच्याशी चर्चा करताना त्यांची भूमिका कळेल. मात्र सत्ताधाऱ्यांच्या कामाची ही पद्धतच आहे पैसे खाण्यासाठी निविदा काढायच्या आणि कामे रखडवायची वाहतूक कोंडी आणि जोडरस्ते याबाबत त्यांना काहीही पडलेली नसून नागरिकांचे हाल होत असल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी केला. पत्रिपुला कडे येणाऱ्या आमदार पाटील यांच्या ताफ्याला  पुलाच्या दुसऱ्याच बाजूला पोलिसांनी रोखले अखेर आमदारांनी कार्यकर्त्यांसह चालत पश्चिमेला येणायचा निंर्णय घेतला पश्चिमेकडे आल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

२)
     गेली दोन ते अडीच वर्ष कल्याण पत्रीपूलाचे  काम सुरु  आहे. सत्ताधारी हा पूल कधी करणार असा प्रश्न पडला आहे.पूल   पूर्ण झाल्याने अनेक नागीकांचे बळी गेले.अनेकांना शारीरिक त्रास झाला. आता शिवसेने श्रेय घेत   आहे, दर आये दुरुस्त आहे असा असा शिवसेनेच्या या   कामाबाबत म्हणावे लागेल.कल्याण पत्रीपुलाच्या कामाबाबत जनता शिवसेनेवर प्रचंड नाराज आहे.

         - भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे  

0 Comments: