कविता : प्रेम हे अहिंसाचे बळ..!!

कविता : प्रेम हे अहिंसाचे बळ..!!

 कविता : प्रेम हे अहिंसाचे बळ..!!




अंधाराच्या वाटेवर कधीच

दिशेचा मार्ग सापडत नसतो

प्रकाशाच्या दिशेला नेहमी 

   पावलांचा सहवास असतो

  

   नदीही वाहणारी असून

    पाण्याची मर्यादा असते,

  सागराशी शर्यत करू नका

लाटांच्या वेगाला तोड नसते


  प्रेमाने तुम्ही मनाला जिंकाल

  वैराने नेहमी दुष्मनी वाढते

   प्रेम हे अहिंसाचे बळ आहे

हिंसाने सर्वस्व नष्ट होते

   

सकारात्मक शब्दाला यश

नकारात्मकात अपयश आहे

शुभ विचारात मन परिवर्तन

  यश मिळवून जगायचे आहे


कवी :-  सुभाष पटनाईक,कल्याण

0 Comments: