मनसे डोंबिवली शहर विभाग व चिदानंद ब्लड बॅंक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान आणि प्लझ्मादान शिबिर

डोंबिवली ( शंकर जाधव ) कोवीड १९ च्या प्रादुर्भावामुळे प्रभावीत झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा आणि याच कोवीड १९ मुळे प्रभावीत झालेल्या रक्तपेढ्यांना सक्षम करण्यासाठी आमदार प्रमोद (राजु) पाटील यांच्या सुचनेनुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना डोंबिवली शहर विभाग क्रमांक ५ व ६ आणि चिदानंद ब्लड बॅंक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान आणि प्लझ्मादान शिबिर संपन्न झाले. कल्याण जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश भोईर यांच्या मार्गदर्शन लाभले.मनसे पदाधिकारी अरुण रामचंद्र जांभळे यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 67 रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, शहर संघटक प्रल्हाद म्हात्रे, हरिश पाटील, महाराष्ट्र सैनिक योगेश पाटील, मनविसे शहर अध्यक्ष सागर जेधे, शहर संघटक सुमेधा थत्ते, प्रतीभा पाटील, स्मिता भणगे, उपशहर अध्यक्ष राजु पाटील, श्रद्धा किरवे, निलीमा भोईर, प्रथमेश खरात आदी उपस्थित होते.या कार्यक्रमास शाखा अध्यक्ष हेमंत दाभोळकर,अश्विन पाटील,संकेत तांबे,केतन सावंत,महेश पांचाळ,नंदकिशोर भोसले,अनुपमा दळवी,योगीता जोशी,सुप्रिया साळवी,शालिनी भोईर,प्रिया कडू,सुप्रिया पालांडे,श्रद्धा शिगवण,आर्या शुक्ल तसेच विभागातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी अथक मेहनत घेतली.
0 Comments: