दिवाळी व नाताळ सणात फेरीवाल्यांवरील कारवाई थांबवण्यासाठी मागणी

दिवाळी व नाताळ सणात फेरीवाल्यांवरील कारवाई थांबवण्यासाठी मागणी

 दिवाळी व नाताळ सणात फेरीवाल्यांवरील कारवाई थांबवण्यासाठी मागणी

 डोंबिवली ( शंकर जाधव )  कोरोना काळात लॉकडाऊन जाहीर केल्याने कोरोना नियंत्रणात आला. परंतु सणासुदिच्या दिवसात नागरिकांची बाजारपेठ्यात खरेदीसाठी गर्दी होत असते.त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये नागरिकांनी गर्दी करू नये असे राज्य सरकारचे निर्देश दिले असूनही सणाच्या दिवसात नागरिक गर्दी करताना दिसतात. नागरिकांना सांगूनही ते निर्देशाचे पालन करत नसल्याने जे ज्या ठिकाणी खरेदी करतात त्या ठिकाणी फेरीवाल्यांना बसल्यास मनाई करण्यात आली आहे.दिवाळी सणाच्या चार ते पाच दिवसापासून बाजारपेठ्यात गर्दी केल्याने पालिका प्रशासनाने फेरीवाल्यांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.मात्र सणासुदीला फेरीवाल्यांना कमवण्याचे दिवस असल्याने त्यांच्यावर कारवाई करू नये अशी मागणी अन्याय निवारण भष्ट्राचार निर्मुलन संस्थेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष केनेथ आर.बी.( केनी ) यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.तर उपायुक्त सुधाकर जगताप म्हणाले, बाजारपेठ्यात नागरिकांनी खरेदी करताना तोंडावर मास्क लावून सोशल डिस्टेंसिंगचे पालन केले पाहिजे.पथपथावर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाते. नागरिकांनी दिलेल्या सूचनांचे पालन केले नाही आणि फेरीवाल्यांनी ग्राहकांना तश्या सूचना करण्यास सांगितले नाही तर त्यांच्यावर केली जाते. जर नागरिकांनी गर्दी केली नाही आणि नियमांचे पालन केले तर कारवाईत थोड्याफार प्रमाणात शिथिलता आणता येईल.    

0 Comments: