भारतीय संविधान
प्रत्येक भारतीयाला आहे याचा सार्थ अभिमान
जगात सर्व श्रेष्ठ ठरले आहे भारतीय संविधान...
डॉ.भिमराव रामजी आंबेडकरांनी केलं ते कार्य महान
लिहून ठेवले आहे जगामधिल सर्व श्रेष्ठ भारताचे संविधान...
दोन वर्षे अकरा महिने सतरा दिवस केले लिहीण्यास अपार कष्ट
पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न केला, ना केली कशाची पर्वा , लिहीले संविधान सर्व श्रेष्ठ...
बांधून अखंड भारत सारा समता बंधुता आणि न्याय या अनमोल तत्व प्रणालीत
ना ठेविला भेदभाव कशातच,म्हणोनी नांदतात सारे भारतीय आज येथे सुखात...
ना केली कशाची आस,ना ठेवली हाव कशाची निस्वार्थीपणाने लिहीले एकट्याने संविधान
विद्वत्वेचा श्रेष्ठ शिरोमणी कबुल केले डॉ.भिमराव आंबेडकर यांना सा-या जगाने...
विश्वात श्रेष्ठ ठरले भीमरायांनी लिहीलेले भारतीय संविधान, भारतीय संविधान
कवी दीप लिहीतो भीमरायांची स्फुर्ती गीते
आहे याचा आम्हांस सार्थ सार्थ अभिमान...
रचनाकार ©️®️ कवी दीप.
कल्याण प, जिल्हा ठाणे,
महाराष्ट्र राज्य.
मो.नं ८६०५५६४८६८





0 Comments: