कविता : सजली हो दिवाळी

कविता : सजली हो दिवाळी

 कविता : सजली हो दिवाळी 



स्वागत करती  सारे दारी घालुनी रांगोळी ।

आली सणांची महाराणी सजली हो दिवाळी ।।धृ।।


आगमन तिचे डौलदार येई सर्वांच्याच दारी ।

तिच्या नसे ठायी कुणी राव आणि भिकारी।।

दिसे आंनदी आनंद सर्वांच्याच भाळी ।।१।।


नांगरधारी शेतकरी पिकवितो धान्याच्या राशी।

पूजा करतो गोधनांची कुणा ठेवी ना उपाशी।।

सर्वासाठी बळीराजा तो नित्य घाम गाळी ।।२।।


आंनदाच्या या क्षणी, उत्साह सान-थोरांच्या मनी।

फटाक्यांची आतषबाजी घुमे आसमंतातूंनी।।

लख्ख दिव्यांच्या प्रकाशाने तिमिर उजळी ।।३।।


लाडू,चकल्या,शंकरपाळी करंज्या आणि शेव।

फराळाचे ताट शेजारच्या काकु करती देवघेव।।

स्नेहबंध वाढूनी संतोष नांदे सर्वांजवळी ।।४।।



कवी: हरिसंतोष उर्फ

संतोष गोपाळ सावंत,(डोंबिवली),

नरडवे, सिंधुदुर्ग


 सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !

0 Comments: