कल्याण पूर्व येथील १०० फुटी रस्त्यालगत आरक्षित भूखंडावर उभारणार अद्ययावत रुग्णालय व क्रीडासंकुल

कल्याण पूर्व येथील १०० फुटी रस्त्यालगत आरक्षित भूखंडावर उभारणार अद्ययावत रुग्णालय व क्रीडासंकुल

 कल्याण पूर्व येथील १०० फुटी रस्त्यालगत आरक्षित भूखंडावर उभारणार अद्ययावत रुग्णालय व क्रीडासंकुल

         खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची पालिकेला सूचना


 

डोंबिवली ( शंकर जाधव )  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील कल्याण पूर्व येथील तिसगाव मधील १०० फुटी रस्त्यालगत रुग्णालयासाठीतसेच क्रीडा संकुलासाठी भूखंड आरक्षित असून ते त्वरित ताब्यात घेऊन येथे रुग्णालय व क्रीडा संकुल उभारण्याची प्रक्रिया सुरू करण्याची सूचना कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेला केली आहे.

  या १०० फुटी रस्त्यालगत भूखंड आरक्षण क्र. २८३सर्वे क्र. ३३ (पार्ट)४०(पार्ट)४१ (पार्ट)४२ (पार्ट)४३ (पार्ट)४४ (पार्ट)५३ (पार्ट) हे रुग्णालयासाठीतर २७९ सर्वे क्र. ५५ (पार्ट)५४८/ए५६ (पार्ट) क्रीडासंकुलासाठी आरक्षित आहे. सद्यस्थितीत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकांच्या रुग्णालयांवर प्रचंड प्रमाणात भार असून करोनामुळे हा ताण अधिकच वाढला आहे. या अनुषंगाने आरोग्य व्यवस्था बळकट करण्यासाठी व भविष्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सदर आरक्षित भूखंडावर अद्ययावत रुग्णालय उभारणे अत्यंत गरजेचे असल्याचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. यासाठी स्वतः खा. शिंदे वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा देखील करीत आहेत. त्याचबरोबर क्रीडा संकुलासाठी आरक्षित भूखंडावर स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भव्य असे क्रीडासंकुल उभारण्याची सूचना देखील डॉ. शिंदे यांनी केली आहे.त्या अनुषंगाने ०६ नोव्हेंबर २०२० रोजी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत या दोन्ही आरक्षित भूखंडांचे विषय उपस्थित करून मंजुरी मिळविण्यात आली. या आरक्षित भूखंडांवर अद्ययावत रुग्णालय व क्रीडासंकुल उभारण्याकरीता लवकरात लवकर भूसंपादनाची प्रक्रिया सुरू करावीतसेच तांत्रिक उपकरणासाठी लागणाऱ्या निधीसाठीचा प्रस्ताव तयार करून त्वरित राज्य शासनाकडे पाठविण्याची सूचनाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना दिल्या आहेत.

0 Comments: