कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चर्
डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात २०१५ साली २७ गावांचा नव्याने समाविष्ट करण्यात आला होता. परंतु सन २०२० मध्ये २७ गावे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातून वगळण्याचा राज्य शासनाच्या निर्णयानंतर १८ गावांची वेगळी नगरपरिषद स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु २७ गावांपैकी १८ गावे वगळून उर्वरित ९ गावे ही कल्याण डोंबिवली महापालिकेतच ठेवण्यात आले आहे. या उर्वरित ९ गावांवर सन २०१७-१८ ते आजपर्यंत आकारण्यात आलेली कर आकारणी पूर्वीच्या करापेक्षा १० पटीने वाढीव कर आले आहे. सदर वाढीव मालमत्ता कर कमी करण्यासाठी आग्रही राहून कल्याण लोकसभा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वारंवार महापालिका आयुक्त यांचेकडे पाठपुरावा करून मंजूर करून घेतले. यामुळे करात तब्बल दोन तृतीयांश इतकी घट करण्यात आल्याने स्थानिकांना मालमत्ता करात मोठ्या प्रमाणावर दिलासा मिळाला आहे. याच निमित्ताने कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (कामा) या संस्थेच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेऊन खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे मनापासून आभार व्यक्त केले. यावेळी कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (कामा) या संस्थेचे अध्यक्ष देवेन सोनी, शिष्टमंडळ व सदस्य, कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे, नगरसेवक दिपेश म्हात्रे, योगेश म्हात्रे व कल्याण ग्रामीण पदाधिकारी उपस्थित होते.





0 Comments: