त्रिपूरी पोर्णिमेचे औचित्य साधून आयोजित खाद्यतेल दानयज्ञास  डोंबिवलीकरांचा उदंड प्रतिसाद ...

त्रिपूरी पोर्णिमेचे औचित्य साधून आयोजित खाद्यतेल दानयज्ञास डोंबिवलीकरांचा उदंड प्रतिसाद ...

  त्रिपूरी पोर्णिमेचे औचित्य साधून आयोजित खाद्यतेल दानयज्ञास  डोंबिवलीकरांचा उदंड प्रतिसाद ...




डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवलीच्या रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट, इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट आणि  गणेश मंदीर संस्थान डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने त्रिपूरी पोर्णिमेचे औचित्य साधून   गणेश मंदीरात दिपोत्सव आणि खाद्यतेल दानयज्ञ आयोजित केला होता.  सालाबादप्रमाणे या वर्षीही रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट आणि इनरव्हील क्लब डोंबिवली वेस्ट यांच्यातर्फे सेवाभावी संस्थांना खाद्यतेल वाटप करण्याच्या उपक्रमात खाद्यतेल दान करुन किंवा आर्थिक मदत करुन खारीचा वाटा उचलण्याचे आवाहन या उपक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमन चंद्रशेखर देशपांडे यांनी केले होते आणि त्याला प्रतिसाद देताना डोंबिवलीकरांनी आत्ता पर्यंत साधारण ४०० लिटर खाद्यतेल दान केले आहे आणि अजूनही मदत येत आहे. जमा होणारया खाद्यतेलाचे वाटप हे समतोल फाऊंडेशन, चिंध्याच्या वाडीची शाळा,पचर्वांचल वस्तीगृह, भरारी अपंगालय, सावली केंद्र अशा सेवाभावी संस्थांना करण्यात येणार आहे असे रोटरी क्लबचे अध्यक्ष  दिलीप भगत म्हणाले.
      कोरोना महामारीच्या पार्श्र्वभूमीवर साधारणपणे ८ महिन्यांनंतर गणेश मंदीरात प्रथमच उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. साधारणपणे ३०० ते ३५० तेलाच्या दिव्याने मंदीर उजळले होते आणि संस्कार भारतीची रांगोळीही सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. सदर उपक्रमाला रोटरी क्लब डोंबिवली वेस्टचे अध्यक्ष  दिलीप भगत, कार्यवाह शैलेश गुप्ते, प्रोजेक्ट चेअरमन चंद्रशेखर देशपांडे, देशपांडे, श्रीपाद कुलकर्णी, दिपाली पाठक, दिपक काळे उपस्थित होते तर इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट च्या कांचन तर्टे, आरती मोघे, आणि शुभांगी काळे उपस्थित होते तर गणेश मंदिर संस्थानातर्फे शिरीष आपटे, प्रवीण दुधे आणि अलकाताई मुतालिक उपस्थित होत्या.

0 Comments: