बुध्द धम्माने आम्हां

बुध्द धम्माने आम्हां

 बुध्द धम्माने आम्हां 


बुध्द धम्माने आम्हां मार्ग समतेचा दिला ...।।धृ ।।

जे जे शाश्वत आहे जगी

 ते ते जपावे तुम्हीं मनी 

जे जे शाश्वत आहे जगी

ते ते जपावे तुम्हीं मनी

बुध्द धम्माने आम्हां मार्ग समतेचा दिला ..।।१।।


हिंसा नसे मार्ग जीवनाचा अहिंसा अंगी तुम्हीं आचरा

लालसेच्या मागे व्यर्थ धावू नका

कष्ट करण्याची तयारी दाखवा...

बुध्द धम्माने आम्हां मार्ग समतेचा दिला ...।।२।।


बुध्दांचे तत्व तुम्हीं अनुसरा, पंचशील पालन तुम्हीं अनुसरा

युध्दाने युध्द वाढते जगी , नाही निवारण त्यातून जगी...

बुध्द धम्माने आम्हां मार्ग समतेचा दिला ...।।३।।


देह आहे व्याधींचे घर , आहे तो तसाच नश्वर

चंचल मनाला तुम्हीं आवरा वेळेआधीच त्यास सावरा 

तथागतांनी दिलेल्या बुध्दधमाला तुम्हीं अनुसरा

बुध्द धम्माने आम्हां मार्ग समतेचा दिला ...।।४।।


त्रिशरण पंचशील अष्टांगिक मार्ग समतेचा करा आत्मसात

मिळेल शांती घरा घरात आणि सा-या विश्वात...

बुध्द धम्माने आम्हां मार्ग समतेचा दिला ...।।५।।


 रचनाकार ©️®️🖋️ कवी  सरस्वतीपुत्र. कल्याण प, जिल्हा ठाणे,

महाराष्ट्र राज्य. मो.न.+91 86250 48981.

0 Comments: