दिवाळी सणात फटाके विक्रीवर बंदीची शिवसेनेची मागणी ....
डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मार्च २०२० पासून राज्य सरकारने लॉकडाऊन जाहीर केले होते.ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस कोरोनाचा प्रभाव कमी होताना दिसत आहे. मात्र दिवाळी सणात वायू प्रदूषण वाढण्याची शक्यता असून कोरोनावर उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांना याचा त्रास होऊ शकतो.फाटक्यामुळे धुराचा त्रास होण्याची शक्यता लक्षात घेत शिवसेनेने दिवाळी सणात फटाके विक्रीवर बंदी आणण्याची मागणी केली आहे.शिवसेना डोंबिवली शहरप्रमुख राजेश मोरे यांनी पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांना यासंदर्भात पत्र दिले आहे. याबाबत राजेश मोरे म्हणाले. दिवाळी सण साजरा केला पाहिजे.पण यावर्षी पारंपारिक पद्धतीने साजरा केला पाहिजे.फटाके वाजवले जात असताना ध्वनी प्रदूषण तर होतेच त्याचबरोबर वायू प्रदूषणहि होते. तर कल्याण लोकसभा उपजिल्हाप्रमुख सदानंद थरवळ म्हणाले.२०२० या वर्षात कोरोनामुळे अनेक जणांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे यावर्षी साध्या पद्धतीने दिवाळी साजरा करावी. तसेच फटाके वाजवून वायू प्रदूषणात आणखी भर नको. याचा त्रास कोरोनावर उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांना होऊ शकतो.शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या या मागणीबाबत पालिका आयुक्त डॉ सूर्यवंशी कोणती भूमिका घेतील हे लवकरच दिसेल




0 Comments: