चंद्रकांत खोसे सर यांना राज्यस्तरीय "समाजभूषण गौरव" पुरस्कार व राज्य स्तरीय गुणवंत शिक्षक गुरु गौरव शिक्षक रत्न पुरस्कार- 2020 ची निवड

चंद्रकांत खोसे सर यांना राज्यस्तरीय "समाजभूषण गौरव" पुरस्कार व राज्य स्तरीय गुणवंत शिक्षक गुरु गौरव शिक्षक रत्न पुरस्कार- 2020 ची निवड

 चंद्रकांत खोसे सर यांना राज्यस्तरीय 

"समाजभूषण गौरव" पुरस्कार व राज्य स्तरीय गुणवंत शिक्षक गुरु गौरव शिक्षक रत्न पुरस्कार- 2020 ची निवड 



कवी, कथालेखक व मोहीते पाटिल विद्यालयातील वरिष्ठ शिक्षक श्री.चंद्रकांत हरिभाऊ खोसे सर यांना भजन सम्राट तथा समाज भूषण स्वर्गीय ह.भ.प.विठोबा. अ.मरवडे 

सामाजिक प्रतिष्ठान, रायगडचा राज्यस्तरीय "समाजभूषण गौरव-2020" पुरस्कार नुकताच प्राप्त

झाला.

  

            भजन सम्राट तथा समाज भूषण स्वर्गीय ह.भ.प.विठोबा.अ.मरवडे यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमीत्त स्वर्गीय विठोबा.अ मरवडे सामाजीक प्रतिष्ठान यांच्या वतीने गेल्या पाच वर्षांची यशस्वी परंपरा राखत याही वर्षी  सामाजीक क्षेत्रांतील योगदान देणार्याना प्रोत्साहन देण्यासाठी 

राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार सोहळयाचे आयोजन केले होते.या

वर्षाच्या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदाचा सोहळा हा ऑनलाईन पध्दतीने संपन्न करण्यात

आला."समाजभूषण " या पुरस्कारासाठी मोहीते पाटिल विद्यालय, मानखुर्द शाळेचे वरिष्ठ शिक्षक- श्री.चंद्रकांत हरिभाऊ खोसे यांची निवड करण्यात आली व त्यांना

आकर्षक ऑनलाईन सन्मानपत्र

देऊन गौरवण्यात आले.या त्यांच्या

अफलातुन घवघवीत यशाबद्दल त्यांचे

सर्व स्तरवरुन अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


तसेच मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे राज्य स्तरीय गुणीजन गौरव महसंमेलन 2020

राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा मानकरी

निवड समितीने मोहीते पाटिल विद्यालय, मानखुर्द शाळेचे वरिष्ठ शिक्षक- श्री.चंद्रकांत हरिभाऊ खोसे सर यांची" राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक

गुरुगौरव  शिक्षक रत्न पुरस्कार 2020" साठी निवड करण्यात आली आहे 


या त्यांच्या यशाबद्दल सर्व स्तरावर कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे

तसेच मोहीते पाटिल विद्यालय, मानखुर्द शाळेचे मुख्याध्यापक व संस्थेचे खजिनदार श्री एस एस जाधव सर व संस्थेचे अध्यक्ष व माजी मुख्याध्यापक एन.टी.शिंदे सर यांनी

खास कौतुक व अभिनंदन केले आहे

मोहीते पाटिल विद्यालयात श्री.चंद्रकांत हरिभाऊ खोसे सर यांच्या 

पुरस्काराने आनंदाची लहर उसळली

आहे.

0 Comments: