मंथन फाउंडेशन चे APMC मार्केट वाशी मध्ये एचआयव्ही एड्स जनजागृतीचे विविध उपक्रम
जागतिक एड्स दिनाचे १ डिसेंबर, औचित्य साधून मंथन
फाउंडेशन ट्रकर्स प्रोजेक्ट, वाशी जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण केंद्र, ठाणे व महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षीचे घोषवाक्य "जागतिक एकता ,सामायिक जबाबदारी' हे आहे. मंथन फाउंडेशन APMC मार्केट मध्ये काम करते. ट्रक टर्मिनल वाशी , तुर्भे स्टोअर येथे घेतलेले कार्यक्रम हे एच. आई. व्ही. जनजागृती, एचआयव्ही धोका टाळण्यासाठी कंडोम वापराचे प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. पोस्टर तसेच गेम्स च्या माध्यमातून एच आई व्ही / एड्स च्या गैरसमजुती दूर करण्यात आल्या व आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते व घोष वाक्य द्वारे देखील जनजागृती केली. यामध्ये लाभार्थी ट्रक ड्राइवर, लोडर , हेल्पर , माथाडी कामगार होते.
आशा भट्ट , मंथन फाउंडेशन अध्यक्षा यांनी असे सांगितले की १ ते ७ डिसेंबर हा सप्ताह मध्ये विविध नियोजन केले जाणार आहे. दरवर्षी १ डिसेंबर हा दिवस एचआयव्ही संक्रमण व एड्स जनजागृती साठी पाळला जातो. संस्था अति जोखीम गट, त्यांचे रहवाशीचे ठिकाण, रिक्षा चालक, ट्रक ड्राइवर, गरोदर माता,टी. बी. रुग्ण इत्यादीना एच. आय. व्ही. तपासणीसाठी प्रोत्साहित करणे व जे एच आय व्ही संसर्गित आहेत त्यांना राष्ट्रीय कार्यक्रमास जोडणे व औषध उपचार चालू करणे आणि औषधउपचार मध्ये सत्यता ठेवणे हा सकारत्मक उद्देश आहे.
या कार्यक्रमास ठाणे जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री. रतन गाढवे , जिल्हा पर्यवेक्षक श्री. अशोक देशमुख , नीलिमा पाटील यांच्या सहकार्याने व मंथन फाउंडेशन च्या अध्यक्षा आशा भट्ट यांच्या मार्गदर्शनाने , प्रोग्रॅम मॅनेजर प्रवीण गायकवाड , सोनल सावंत , विकास मोरे , संदेश ढाले , ओमकार सावंत , शिवभारती , जर्लीन नादार, महिमा पांडे , शिवानी लाड , रिया पाटणकर , अक्षता कीर्तने इ . मुळे कार्यक्रम यशस्वी केला.




0 Comments: