खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने  शहाडमध्ये १४ कोटींच्या रस्त्याचे काम पूर्ण

खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने शहाडमध्ये १४ कोटींच्या रस्त्याचे काम पूर्ण

 खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने  शहाडमध्ये १४ कोटींच्या रस्त्याचे काम पूर्ण



डोंबिवली ( शंकर जाधव ) : भाजपाचे खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने शहाडमधील १४ कोटींच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. या रस्त्यावरून लवकरच वाहतुकीला सुरूवात होणार असून, हजारो नागरिकांची वर्षानुवर्षांपासून सुरू असलेल्या खड्ड्यातील प्रवासातून सुटका होणार आहे. खासदार कपिल पाटील यांच्याबरोबरच माजी खासदार जगन्नाथ पाटील, माजी आमदार नरेंद्र पवार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी आज रस्त्याची पाहणी केली.
मोहोने शेड कोळीवाडा-एनआरसी गेट ते तलाव रस्त्याची दुरवस्था झाली होती. या रस्त्यावरून प्रवास करताना पादचाऱ्यांबरोबरच वाहनांतील प्रवाशांचे हाल होत होते. या पार्श्वभूमीवर खासदार कपिल पाटील यांनी रस्त्यासाठी पाठपुरावा केला होता. त्यानंतर या रस्त्यासाठी १४ कोटींचा निधी मंजूर झाला. या रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाल्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला. या रस्त्यांची आज पाहणी करण्यात आली. त्यावेळी काही सुचना करण्यात आल्या. खासदार पाटील यांच्याबरोबरच ज्येष्ठ नेते जगन्नाथ पाटील, नरेंद्र पवार, प्रेमनाथ म्हात्रे, दिनेश तावडे, माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, शक्तिवान भोईर, राजाभाऊ पातकर, प्रमोद घरत, मनिषा केळकर, रमेश कोनकर, मुक्ता पाटील, संतोष शिंगोळे, राजा आधिवार यांचीही उपस्थिती होती. या रस्त्याचे लवकरच लोकार्पण करण्यात येणार आहे.

0 Comments: