अनधिकृत बांधकामाविरोधात सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांचे ४४ दिवसापासून
आंदोलन कुटुंबीयांच्या जीवाला धोका ... पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष...
डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकका हद्दीत अनेक वर्षापासून अनधिकृत बांधकामांना पेव फुटला आहे. पालिका प्रशासनाच्या नाकावर टीच्च्चून काही विकासकांनी राजरोजपणे अनधिकृत बांधकामे सुरु ठेवली आहेत.या विरोधात सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी आजवर अनेक आंदोलने करून प्रशासनाला जागे करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रशासनाने या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. महेश निंबाळकर यांच्या आंदोलनाला ४४ दिवस पूर्ण झाले.आपण आंदोलन करत असल्याने आपल्या कुटुंबियाच्या जीवाला धोका असल्याचे निंबाळकर यांनी सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तर अनधिकृत बांधकामांवर पालिकेने हतोडा मारला नाहीत येत्या ८ दिवसात पालिकेच्या प्रत्येक प्रभाग कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा निवेद्नादवारे दिला आहे.
अनधिकृत बांधकाम आणि अनधिकृत जैन प्रार्थनास्थळ या विरोधात आंदोलन करत असल्याचे सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी सांगितले. निंबाळकर यांच्यावर काही वर्षांपूवी जीवघेणा हल्ला झाला होता.मात्र निंबाळकर यांनी आपले आंदोलन मागे न घेता अधिकच तीव्र केले. अनधिकृत बांधकामाविरोधात कारवाई होत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांच्या सदर प्रकारणातजबाबदार ठरविले आहे. निंबाळकर यांना आंदोलनामुळे पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागली. वास्तविक निंबाळकर यांचे आंदोलन लोकशाहीत कायद्यानुसार असूनही त्याकडे पालिका प्रशासना लक्ष देत नाही हे जनतेच्या नजतेतून सुटले नाही. अनधिकृत बांधकामांना अभय देणाऱ्या पालिका प्रशासनाला कधीतरी आपल्या आंदोलनाची दाखल घ्यावी लागेल अशी अपेक्षा निंबाळकर यांना आहे याबाबत निंबाळकर यांना पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले,कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील अनधिकृत बांधकामाविरोधात पालिका प्रशासनाला अनेक वेळेला पत्रव्यवहार केला. मात्र पालिका प्रशासन याकडे थातूर-मातुर उत्तरे देऊन टाळण्याच्या प्रयत्न करत आहेत. खर पाहता हे आंदोलन जनतेसाठी असून माझ्या आंदोलनामुळे जनतेला वास्तव्य कल्ले मात्र त्यांना प्रशासना गप्प आहे. यापूर्वी झालेल्या आंदोलनाचा विचार करता पुन्हा हल्ला होण्याची शक्यता आहे.जर माझ्यावर हल्ला झाला तर याला पालिका आयुक्तांसह प्रभाग क्षेत्र अधिकारी जबाबदार असेल असे पत्र सहाय्यक पोलीस आयुक्त जयराम मोरे यांना दिले.





0 Comments: