महापरिनिर्वाण
शोधू कुठे मी आता कोटी कोटी च्या पित्याला
दूर दूर गेला आहे आज सोडूनि आम्हाला ||धृ||
पाने हलेना,झाली मुक झाला आज वारा
भर सागरात होडी जनू शोधत असे किनारा
अवस्था अशी ती झाली पाहून युगंधराला
शोधू कुठे मी आता कोटी कोटी च्या पित्याला ||१||
गरिबी घरची होती शिक्षणाची आस मोठी
स्व:तापुरता विचार नाही केला उद्धार आमुच्या साठी
परिश्रमाने मिळविले सारे दान देऊन आम्हा गेला
शोधू कुठे मी आता कोटी कोटी च्या पित्याला ||२||
चंदना परि तो झिजला चंदनात आज निजला
धगधगता निखारा होता आगी समान जगला
कशी लावू आग नरेशा जो जीवन भरी जळाला
शोधू कुठे मी आता कोटी कोटी च्या पित्याला ||३||
कवी नरेश गंगाराम जाधव (भिवंडी)
मो.७५१७३८९७४६





0 Comments: