जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेचे  सामाजिक बांधिलकीतून  सॅनिटायझर वितरण

जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेचे सामाजिक बांधिलकीतून सॅनिटायझर वितरण

 जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेना

संलग्न - ऑल इंडिया भारतीय कामगार सेना महासंघ.

जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेचे  सामाजिक बांधिलकीतून  सॅनिटायझर वितरण

मंगळवार दि.१५ डिसेंबर २०२०




जय महाराष्ट्र शिक्षक व  कर्मचारी सेना युनियनने कोविड - १९ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्याच्या उपक्रमात आपली सामाजिक बांधिलकी जपत आज करीरोड येथील त्रिवेणी संगम इमारतीत मुंबईतील सुमारे २०० खाजगी अनुदानित प्राथमिक सभासद शाळांना संघटनेमार्फत प्रति शाळा ५ लीटर  सॅनिटायझरचे वितरण करण्याचा  उद्घाटन समारंभ आयोजित केला.  बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण समिती अध्यक्षा मा.श्रीम. संध्या दोशी मॅडम यांच्या शुभहस्ते हा उद्घाटन समारंभ करण्यात आला. सदर कार्यक्रमास शिक्षणाधिकारी श्री.महेश पालकर साहेब उपस्थित होते. 

     जय महाराष्ट्र संघटनेच्या या उपक्रमाची संकल्पना उपस्थित मान्यवरांना अगदी मनापासून भावली. त्यांनी  संघटनेचे कौतुक केले व पुढील वाटचालीस भरभरून शुभेच्छाही दिल्या. 

मा. संध्या दोशी मॅडम यांनी यावेळी खाजगी शाळांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी  संघटनेला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले. तसेच संघटनेकडून यापुढेही असेच सामाजिक उपक्रम  आयोजित केले जावेत असा सूचक सल्लाही दिला. तसेच मा. महेश पालकर साहेब यांनी  सॅनिटायझरच्या वापराबाबत काही मार्गदर्शक सूचनाही यावेळी  उपस्थितांना दिल्या. सदर सूचनांचे पालन शाळांनी करावे अशी इच्छाही व्यक्त केली.  याबाबत संघटना पुढाकार  घेईल व सहकार्य करेल असे आश्वासन संघटनेकडून देण्यात आले.

जय महाराष्ट्र शिक्षक व कर्मचारी सेनेचे प्रमुख सल्लागार व शिवसेना उपविभागप्रमुख मा.श्री. जितेंद्र जानावळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व संघटनेचे संस्थापक/ अध्यक्ष श्री.विजय पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला.

       यावेळी संघटनेच्या वतीने प्रमुख सल्लागार श्री.जितेंद्र जानावळे साहेब, अध्यक्ष श्री. विजय पाटील व सरचिटणीस श्री. संदीप परब यांनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी श्री. सुनिल सुर्वे, श्रीम. कांचन मस्के, श्रीम.जयश्री दडस, श्री.भास्कर रोंगटे, श्री. धोंडिराम दळवी, श्री. उमेश तोडणकर, श्री. महेश मुळमुळे, श्री. विजय खोत, श्री. दिलीप घाडी, श्री. रामदास हंजनकर, श्री. संजय लवाटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

     यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात मुंबईतील सुमारे  २५ शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. कानोलकर मॅडम यांनी केले. तर आभार प्रदर्शन श्रीम. स्मिता गाजुल यांनी केले.

0 Comments: