डोंबिवलीच्या युवक-युवतींनी घेतले सैनिकी प्रशिक्षणाचे धडे..
डोंबिवली : डोंबिवली पश्चिमेला शालेय आणि महाविद्यालयीन युवक-युवतींना मनसे तर्फे दुसऱ्या सत्रातील हे 3 दिवसीय सैनिकी प्रशिक्षणाचे धडे दिले. तीन दिवसीय या शिबिरात फिजिकल ट्रेनिंग,वेपन ट्रेनिंग,रायफल शुटींग, सेल्फ डिफेन्स,फायर सेफ्टी,आर्मीसाठी लागणारे प्रशिक्षण दिले गेले. यात तरुणीसाठी खास आत्मसंरक्षणाचे धडे दिले गेले आहेत. यात अनेक मुलामुलींनी आनन्द व्यक्त केला. या प्रशिक्षणबद्धल खुश होत अनेक मुलांनी आपले मनोगत व्यक्त केले. यात प्रक्षिक्षण देणाऱ्या शिक्षकांचे व शिबिर राबवणारे व्यक्तींचे विशेषतः नगरसेवक प्रकाशदादा भोईर व सौ, सरोज भोईर यांचे मुलांनी आभार मानले. आतापर्यंत जवळपास 100 हुन अधिक मुलांनी यात भाग घेतला हिता. डिसेंबर मधले हे दुसरे सत्र होते, या आधी 11 ते 13 डिसेंबर ते या कालावधीत पाहिले सत्र पार पडले होते, मुलामुलींचा प्रतिसाद पाहता अजूनही पुढे तिसरे सत्र लवकरच सुरु होणार आहे
असे मनसे जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश भोईर यांनी सांगितले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठी मेहनत घेऊन अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने हा कार्यक्रम पार पाडला.
या कार्यक्रमात अनेक मान्यवरांची भाषणे झालीत, तसेच माजी सैनिक चव्हाण यांनीही प्रशिक्षक व प्रशिक्षण घेणाऱ्या मुलांचे कौतुक केले आणि त्यांनी स्वतःचे अनुभव ही मुलांना कथन केले. अशा पद्धतीने दुसऱ्या सत्रातल्या या प्रशिक्षण शिबिराची 25 डिसेंबरला काल सांगता झाली.





0 Comments: