ऑनलाईन एकपात्री अभिनय स्पर्धा संपन्न
डोंबिवली ( शंकर जाधव ) श्रीकला संस्कार गेली ३८ वर्षे मुलांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करीत असते. संस्थेने सप्टेंबर मध्ये बालनाट्य लेखन स्पर्धेचे आयोजन केले होते.यासाठी महाराष्ट्र व थेट अमेरिकेतून एकूण ३२ मान्यवर लेखकांचा सहभाग लाभला होता.तसेच या लॉकडाऊन मधील दुसरा उपक्रम एकपात्री अभिनय स्पर्धा घेतल्यात आली होती. ही स्पर्धा वय वर्षे ८-१५ व वय वर्षे १६ व पुढील अश्या दोन गटांत घेण्यात आली होती. सदर स्पर्धेसाठी महाराष्ट्रातुन एकूण १०७ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.प्राथमिक फेरीतून प्रत्येक गटातून १० स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. स्पर्धेची अंतिम फेरी झूम अँपवर घेण्यात आली. स्पर्धेसाठी सिनेनाट्य अभिनेत्री मृणाल चेंबूरकर, लेखिका व अभिनेत्री अश्विनी मुकादम, आणि जेष्ठ दिग्दर्शक राजन वाडेकर यांनी परीक्षण करून तसेच योग्य मार्गदर्शन करून निकाल जाहीर केला. प्राथमिक परिक्षणातून सुवर्णा मादुस्कर, ठाणे यांना विशेष लक्षवेधी सादरीकरण पारितोषिकाने गौरविण्यात आले. स्पर्धेवेळी कलाकारांचे कौतुक करण्यासाठी आनंद म्हसवेकर, माधव जोशी, सुरेखा जोशी, ज्योती दाते, आरती मुनिश्वर असे अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची तांत्रिक बाजू संकेत ओक, मधुरा ओक व वृशांक कवठेकर यांनी निष्ठेने सांभाळली आणि खुशाल भगत व मयुरेश केळुसकर यांचे बहुमोल सहकार्य केले. कार्यक्रमाचे संयोजन संस्थेच्या सर्वेसर्वा दिपाली काळे व भाग्यलक्ष्मी पडसलगीकर यांनी केले.
अंतिम फेरी निकाल
गट क्र. १ (वय वर्षे ८-१५)
प्रथम क्रमांक - वैष्णवी थरकुडे, तळेगाव दाभाडे
द्वितीय क्रमांक - समृद्धी मोगल, नाशिक
तृतीय क्रमांक - अन्वित हर्डीकर, पुणे
उत्तेजनार्थ - वंशिका इनामदार, डोंबिवली
उत्तेजनार्थ - सुमेधा चौधरी, ठाणे
गट क्र. २ (वय वर्षे १६ व पुढील)
प्रथम क्रमांक - सखी गुंडये, वरळी
द्वितीय क्रमांक - सुबोध चितळे, ठाणे
तृतीय क्रमांक - मेघा कांबळी, डोंबिवली
उत्तेजनार्थ - राधिका महांकाळ, दादर
उत्तेजनार्थ - अजिंक्य टेकाळे, वरळी







0 Comments: