१८ गावे वगळण्याबाबत महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार

१८ गावे वगळण्याबाबत महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार

 १८ गावे वगळण्याबाबत महाराष्ट्र सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार  



डोंबिवली ( शंकर जाधव ) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची भेट घेऊन वगळलेल्या १८ गावांच्या नगरपालिकेवर उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारच्या अधिसूचनेला स्थगिती दिली असून यावर महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी कल्याण डोंबिवली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष जगन्नाथ (आप्पा) शिंदे व कार्याध्यक्ष डॉ. वंडारशेठ पाटील यांनी निवेदन दिले. त्यावेळी माजी खासदार आनंद परांजपे व युवक जिल्हाध्यक्ष सुधीर पाटील उपस्थित होते. या निर्णयावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील  व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी १८ गावांतील लोकांच्या भावनांचा आदर करत १८ गावे वगळण्याबाबत सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले.

0 Comments: