महामंडळावर आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाला स्थान द्यावे. डॉ. राजन माकणीकर

महामंडळावर आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाला स्थान द्यावे. डॉ. राजन माकणीकर

 महामंडळावर आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाला स्थान द्यावे. डॉ. राजन माकणीकर



मुंबई दि (प्रतिनिधी) महामंडळ वाटपा वेळी महाविकास आघाडी सरकारला आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाचा विसर पडायला नको, अन्यथा आगामी निवडणुकीत आघाडीची बिघाडी करायला वेळ लागणार नाही असा टोला डॉ. राजन माकणीकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलतांना लगावला.

विधानसभा व लोकसभेला काँग्रेस राष्ट्रवादी पक्षासोबत युती करून निवडनुक लढवून मताधिक्याने काँग्रेस राष्ट्रवादी पक्षाला निवडून आणण्यात आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाची म्हत्वापूर्ण भूमिका बजावली आहे.

कुठल्याही अतिशर्थी ना ठेवता बिनशर्त आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाने आघाडी सरकारला मदत करून सत्तेत बसवले आहे. सत्तेतील घटक पक्ष या नात्याने सत्तेत भागीदारी असूनही कोणता अट्टाहास धरला नाही. 

डेमोक्रॅटिक पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून मागणीचा सूर येत असून महामंडळ वाटप करतांना आरपीआय डेमोक्रॅटिक पक्षाचा विसर पडू नये. 

आंबेडकरी जनतेत प्रचंड लोकप्रियता मिळवत असलेले युवा नेते कनिष्क कांबळे व त्यांचा पक्ष भविष्यातील सत्तांतरणाच्या दिशेने वाटचाल करत असून नवी ताकत पक्षाला लाभत आहे.

विधान परिषदेवर घेत असलयाचे सांगून यादीत नावे फिरवून शेवटी निराशा हाती दिली, महामंडळाच्या बाबतीत तर पुनरावृत्ती घडली तर महापालिकेच्या राजकारणाचे चित्र नक्कीच बदलेल आणि महाघाडीच्या सरकारला हार पत्करावी लागेल.

यामुळे महामंडळ वाटप करतांना युवाध्यक्ष कनिष्क कांबळे यांच्या नावाचा विसर पडता कामा नये अन्यथा महापालिकेत आघाडी ची बिघाडी करण्यात आरपीआय कमी पडणार नाही याची नोंद घेण्याचा इशाराही यावेळी राष्ट्रीय महासचिव डॉ राजन माकणीकर यांनी दिला.

सदर विषयी लवकरच राष्ट्रीय उपाध्यक्ष व प्रवक्ता वसंत कांबळे यांच्या नेतृत्वात कॅ. श्रावण गायकवाड, भाई शिवा राठोड, डॉ. राजन माकणीकर, प्रदेशद्याक्ष हरिभाऊ कांबळे, राज्य निरीक्षक बळवंत पाटील आदींचे शिस्तमंडल उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेणार असल्याचीही माहिती डॉ माकणीकर यांनी दिली.

0 Comments: