एक कर्तबगार, हुशार व्यक्तिमत्त्व
म्हणजे डॉ. सतीश पवार
( त्यांच्याच लेखणीतून सत्य परखडपणे मांडलेले,इतरांना स्फूर्ती देणारे, संकटाला सामोरे जात ती पूर्वीच्या परिस्थितीला बदलण्याची शक्ती आपल्या मनगटात आहे, हे दाखवून देणारे, नव्हे तर कर्ज झाल्याने आत्महत्या करणाऱ्याना यातून नक्कीच शिकण्यासारखे आहे. असे हे विचार वाचून अनेकांना प्रेरणा मिळेल)
मी KEM हॉस्पिटलमध्ये MBBS केले.सायन हॉस्पिटलमध्ये DMRE रेडिओलॉजिस्ट आणि सोनोलॉजिस्ट झालो.10 वर्षापूर्वी मी कणकवली मध्ये सोनोग्राफी सेंटर चालू करायचे ठरवले. सेंटर चालू करताना advanced सोनोग्राफी मशिनच घ्यायची असे मी ठरवले होते. सोनोग्राफी कम्पनीचा माणूस मला म्हटला , सर कणकवली मध्ये तुम्ही महाग मशीन घेऊ नका. तेवढा turnover होणार नाही.19 लाखाची मशीन घेण्यापेक्षा तुम्ही 10 लाखाची कामचलाऊ मशीन घ्या. पण मी ठरवले होते की घेईन तर advanced मशीन घेईन कारण त्याचा पेशन्ट ला पण फायदा होईल. या सर्वाचा खर्च, x ray मशीन आणि भाड्याची जागा धरून 25 लाख होत होता.
माझ्याकडे फक्त दिड लाख रुपये होते. तसा मी 8 वर्षे मेडिकल ऑफिसर म्हणून काम केले होते. शिवाय WHO वर सुद्धा काम केले होते. पण तो सगळा पैसा राहते घर घेण्यात खर्च झाला होता.
मी काही खाजगी बँकांकडे गेलो. त्यांनी मला कर्ज द्यायला नकार दिला. एवढी महागडी मशीन या छोट्या गावात चालणार नाही, असे त्यांचे कारण होते. शेवटी स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये गेलो. त्यांनी काही प्रमाणात कर्ज देतो म्हणाले.पण बँक मॅनेजर स्पष्ट म्हणाले, तुम्ही उच्च शिक्षित डॉकटर आहेत म्हणून तुमचे सर्टिफिकेट बघून कर्ज देणार नाही. सर्व मशीन बँकेकडे गहाण ठेवाव्या लागतील. त्याशिवाय अडिशनल security म्हणून तुमचे घर पण गहाण ठेवावे लागेल. मी तयार झालो. तरीपण पैसे कमी पडत होते. मग बायको आणि तिन्ही बहिणींनी कर्ज काढून दिले. एका काकांनी प्रभाकर पवार 6 लाख उसने दिले. ही त्यावेळी मोठी मदत होती.
लोकांच्या दारावर फिरलो कोणी उभे केले नाही
मी KEM Sion ला असताना खूप नातेवाईक तिथल्या डॉक्टर ना दाखवण्यासाठी माझ्याकडे यायचे. मग मी आपले कामधंदे सोडून, लेक्चर बंक मारून त्यांना OPD मध्ये दाखवायचो. लागले तर ऍडमिट करायचो. हे बरेच लोक मध्यम वर्गीय किंवा गरीब होते. त्यांच्याकडून मला काही अपेक्षा नव्हती. पण काही श्रीमंत लोक पण KEM Sion च्या नामांकित डॉक्टर ना दाखवण्यासाठी माझ्याकडे यायचे. त्यांच्यासाठी मी कामधंदे सोडून खूप फिरलो.जिवघेण्या आजारात साथ दिली.
गावी परत आल्यावर मी माझे सोनोग्राफी सेंटर टाकतो, म्हणून हे लोक आता मला थोडीफार तरी कर्जाऊ मदत करतील असा माझा अंदाज होता. पण माझी निराशाच झाली. जी काय मदत केली ती फक्त सख्या बहिणी आणि एका काकांनी केली. माझे मेडिकल स्टुडन्ट ना कळकळीचे आवाहन आहे की त्यांनी मेडिकल कॉलेज मध्ये फक्त अभ्यासच करावा.आपला वेळ वाया घालू नये.
मशीन परत घ्या
सेंटर चालू केले , डॉक्टर ना भेटलो आणि मला वाटले आता हळूहळू पेशंट यायला सुरुवात होईल. कसले काय.पहिले सहा महिने पेशन्ट नाही. दिवसाला दोन पेशन्ट यायचे. त्यात कर्मचाऱ्यांना पेमेंट देणे शक्य नसायचे तर कर्जाची परतफेड करणारं कुठून!खूप टेन्शन यायचे. असे वाटायचे की झोपेत मरून जावे आणि सकाळी जाग येऊ नये.
मी घाईला आलो. कम्पनी ला सांगितले ही 19 लाखाची मशीन परत घ्या आणि मला 10 लाखाची कामचलाऊ मशीन द्या. कम्पनीचा माणूस हसायला लागला. साहेब, मी तुम्हाला मशीन 19 लाखाला दिली. पण आता परत कराल तर 5 लाख पण मिळणार नाहीत. त्यापेक्षा तुम्ही काय करा, एक PRO ठेवा. डॉक्टर ना भेटा. त्यांना CUT देतो म्हणून सांगा. आणि बघा पेशन्ट येतात की नाही.
खूप विचार करून मी CUT द्यायला तयार झालो. त्यावेळी मी सोनोग्राफी साठी 400 रुपये घेत होतो. त्यापैकी 100 रुपये जो पेशन्ट पाठवेल त्या डॉक्टर ला द्यायचे ठरवले.मी एक महिन्यासाठी PRO ठेवला. त्याला सगळ्या डॉक्टर ना भेटायला सांगितले.
आता हळूहळू पेशन्ट यायला लागले. कर्जाचे हप्ते फिटायला लागले. नन्तर काही वर्षांनी नावाजलेले स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ सोडलं माझ्या बाजूला प्रॅक्टिस करायला लागले. त्यांचे पेशन्ट मला आपोआप मिळायला लागले.
आता शहरात बऱ्यापैकी माझे नाव झाले पेशन्ट यायला लागले. आता मात्र मला पेशन्ट पाठवण्यासाठी डॉक्टर ची गरज उरली नाही. गरज सरो वैद्य मरो. मग मी हळूच CUT बंद करून टाकले.
CUT घेणाऱ्या डॉक्टर विषयी माझ्या मनात राग नाही. बऱ्याचदा तो त्यांचा suppementary इन्कम असतो. स्पर्धा एवढी आहे की बऱ्याच general practitioner ची OPD चालत नाही. एक डॉक्टर म्हणाला, सर दिवसाला 500 रुपये पण होत नाहीत. माझ्यापेक्षा हमाल पण जास्त कमवीत असेल. अनेक डॉक्टर कट घेत नाहीत. डॉ नितीन शेट्ये बालरोगतज्ज्ञ, डॉक्टर धनंजय प्रभुदेसाई अशा काही डॉक्टर नी पैशाची पाकिटे परत पाठवून दिली. डॉ म्हाडेश्वर, डॉ मोघे असे अनेक डॉक्टर मला अगोदर पासून ओळखत होते. त्यांना CUT द्यायची माझी हिम्मत नव्हती आणि मी दिले असते तरी त्यांनी घेतले नसते.
CUT साठी डॉक्टर ना वाईट म्हणणे बरोबर नाही. आपली सगळी सोसायटी 80 ते 90 टक्के भ्रष्ट आहे. त्यात सगळे आले. अधिकारी, राजकारणी, डॉक्टर, इंजिनिअर, वकील, ठेकेदार सर्व. आपण सर्व.
भ्रष्टाचार नगरपंचायतीपासून NOC पासून चालू होतो. मेडिकल साठी 15 दिवस 15 फेऱ्या मारून NOC मिळत नाही म्हटल्यावर मी झक मारत 2000 रुपये काढून दिले. मी डॉक्टर म्हणून कमी घेतले. नाहीतर 10000 चा रेट आहे.
भविष्य
आज मी बिनधास्त आहे कारण गेल्या 10 वर्षात चार तालुक्यात नवीन रेडीओलॉजीस्ट आलेला नाही. Postgraduate डॉक्टर अमेरिका इंग्लंड ला जातात. नाहीतर मुंबई पुणे. गावाकडे कोण यायला तयार नसते. कोण postgraduate डॉक्टर गावाकडे प्रॅक्टिस करायला आलाच तरी त्याला गावाकडे येऊन प्रॅक्टिस करणारी postgraduate डॉक्टर बायको मिळत नाही.कोण यायला तयार होत नाही.
तरीपण उद्या कोणीतरी नवीन रेडिओलॉजिस्ट येईलच.
माझ्या स्पर्धेत उतरायला त्याला माझ्यापेक्षा advanced मशीन घ्यावी लागेल. त्याचे हप्ते जीवघेणे असतील. त्यालापण वाटेल रात्री झोपेत मरून जावे. मग तो किंवा ती PRO ठेवील.
त्याच्यामुळे माझे पेशन्ट कमी होतील.
कदाचित मला पण परत एखादा PRO ठेवावा लागेल.
डॉ सतीश पवार
कणकवली. 07 dec 2020
मो. 8108751520
Ps
कितीपण कठीण परिस्थिती असली तरी मी कोणाकडे कमी पैसे असतील किंवा पैसे नसतील तर त्याची सोनोग्राफी करायला नकार दिला नाही की रिपोर्ट अडवून ठेवला नाही. अगोदर पैसे भरून घेत नाही. बरेच डॉक्टर किंबहुना सर्व डॉक्टर हे तत्व पाळतात. आणि मी पण पाळत राहीन.
पैशासाठी कधीच sex determination म्हणजे गर्भातील मुलगा मुलगी सांगणे, हे प्रकार केले नाही आणि जीव गेला तरी करणार नाही.




0 Comments: