डोंबिवलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले अपंगांसाठी मोफत स्वावलंबन कार्डशिबिराचे आयोजन

डोंबिवलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले अपंगांसाठी मोफत स्वावलंबन कार्डशिबिराचे आयोजन

 डोंबिवलीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले अपंगांसाठी मोफत स्वावलंबन कार्डशिबिराचे आयोजन 




प्रतिनिधी  : प्रविण बेटकर, डोंबिवली (ठाणे)

डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे लाडके नेते कर्तव्यतत्पर आमदार मान. श्री. राजुदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि डोंबिवली शहर सचिव श्री. अरुण रामचंद्र जांभळे यांच्या माध्यमातून अपंगांसाठी मोफत स्वावलंबन कार्ड शिबिराचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सुमारे २२५ गरजु अपंग नागरिकांनी लाभ घेतला असून कार्यक्रमास नगरसेवक जिल्हा अध्यक्ष प्रकाश भोईर, नगरसेवक गटनेते मंदार हळबे, महिला जिल्हाध्यक्षा दिपीका ताई पेडणेकर, शहर अध्यक्षा मंदाताई पाटील, उपजिल्हा अधक्षा योगीणी पाटील शहर सचिव कोमल पाटील, विद्यार्थी सेना शहर अध्यक्ष सागर जेधे, शहर संघटक सुमेधा थत्ते प्रतीभा पाटील प्रशांत पोमेंडकर, हरिष पाटील, उपशहर अध्यक्ष राजु पाटील, श्रद्धा किरवे, सपना पाटील, सुहासिनी हरकुळकर, वर्षा शहा, हेमंत दाभोळकर, संदीप म्हात्रे, गणेश कदम, तेजस शेंद्रे, शर्मीला लोंढे, अश्विन पाटील तसेच महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्वावलंबन कार्ड शिबीर कार्यक्रमाचा अनेकांना लाभ झाल्यामुळे प्रसंगी जमलेल्या नागरिकांनी आमदार मान. श्री. राजुदादा पाटील यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. तसेच अश्याच पध्दतीने मनसे ठिक-ठिकाणी ही दिव्यांग लोकांना मदतीचा हात म्हणून कायम त्यांच्या पाठीशी उभी असेल असेही डोंबिवली शहर सचिव अरुण जांभळे यांनी सांगितले. अश्या प्रकारे आदित्य सभागृहात असलेला हा भव्य दिव्य शिबिराचा कार्यक्रम आनंदमय व शांततेत पार पडला.

0 Comments: