थंडीच्या मोक्यावर डोंबिवलीकरांनी केली उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी गर्दी

थंडीच्या मोक्यावर डोंबिवलीकरांनी केली उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी गर्दी

 थंडीच्या मोक्यावर डोंबिवलीकरांनी केली उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी गर्दी

पत्रकार : प्रविण बेटकर,डोंबिवली (ठाणे)




डोंबिवली : डोंबिवलीत सुप्रसिद्ध ठिकाण घरडा सर्कल येथे दरवर्षी प्रमाणे थंडी जाणवू लागल्यानंतर दिल्ली व नेपाळ विक्रेत्यांनी आपले तंबू ठोकले. काही दिवसांपासून थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे डोंबिवलीकरानी नेपाळ व दिल्लीवरून येणाऱ्या उबदार कपड्यांच्या खरेदीसाठी घरडा सर्कलकडे पाऊले उचलली. बाहेरून मुंबईत येणाऱ्या उबदार कपड्यांच्या विक्रेत्यांनी रस्त्याच्या बाजूला आपली दुकाने मांडली असून या विक्रेत्यांकडे वेगवेगळ्या कलाकुसर असलेल्या उबदार टोप्या, हातमोजे, शॉल, स्वेटर्स अश्या प्रकारची दुकाने मांडलेली आहेत. कमीत कमी ४००-५०० दर्जात चांगले उबदार कपडे मिळत असल्यामुळे लोकांनी स्थानिक दुकाने सोडून घरडा सर्कलकडे धाव घेतली. कोरोनाच्या संसर्गामुळे उबदार कपड्यांच्या विक्रेत्यांना यंदा डोंबिवली शहरात यायला उशीर झाला असला तरी थंडीचे प्रमाण काहीसे वाढल्यामुळे नागरिकांनी स्वेटर्सच्या खरेदीसाठी मात्र गर्दी केली आहे. तिबेट-नेपाळ वरून येणाऱ्या या व्यापाऱ्यांनी लहान मुलांचे स्वेटर्स आणि जॅकेटला मोठी मागणी असल्याचे सांगितले. डोंबिवली औद्योगिक नगरीत आम्ही तिबेट- नेपाळ सारख्या ठिकाणावरून ३-४ वर्षापासून व्यापार करण्यास येत असून आम्हाला आजपर्यंत कोणताही त्रास झालेला नाही असे व्यापाऱ्यांनी आदराने आपले मन व्यक्त केले. काहींनी शेजारील आजदे गावात ३ महिन्यासाठी रूम भाड्याने घेतले आहेत.
संपूर्ण माल हा नेपाळच्या काठमांडू व पंजाबच्या लुधियानामधून आणला जातो. शेतीला जोडधंदा म्हणून या धंद्यात ५ ते ६ लाखाची उलाढाल करून आम्ही ३ महिने स्वेटर्स विक्रीचा व्यवसाय करतो, या ठिकाणी व्यवसायाचा जम बसल्यामुळे आम्ही दरवर्षी येथे येतो असे ते म्हणाले. नाशिक सारखे कपड्यांचे भव्य मार्केट मुंबई उपनगरीत किंवा ठाणे जिल्ह्यात जागेची अडचण असल्यामुळे नाहीत.असेही त्यांनी सांगितले.
स्वेटर्सच्या किंमतीत २५% वाढ
गेल्या आठ ते दहा वर्षपासून हे विक्रेते येथे उबदार कपड्यांची विक्री करत असून हे नेपाळ व पंजाबवरून स्वेटर्स विकण्यास आणतात. ३५० पासून १५०० किंमतीपर्यंत येथे स्वेटर्स आहेत. थंडीत स्वेटर्स विक्रीसाठी नेपाळ व तिबेटहुन काही लोक दरवर्षी मुंबई, ठाणे येथे येतात. त्याप्रमाणे यंदाही कल्याण, डोंबिवली स्थानकाबाहेर उबदार कपडे विक्रेत्यांनी आपली दुकाने थाटली आहेत. डोंबिवली पूर्वेकडे घरडासर्कळला रस्त्याच्या बाजूलाच नेपाळ व तिबेटवासीयांचा बाजार भरतो. कोरोनाच्या महामारीमुळे यंदा स्वेटर्सच्या किंमतीत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती नेपाळी महिला विक्रेत्यांनी दिली.
तसेच ब्लॅंकेट, हातमोजे, पायमोजे, मुलांसाठी मंकी, व राउंड व साध्या अश्या वेगवेगळ्या टोप्या आहेत तर यंदा मात्र बाजारात ६५० ते ८०० नवीन लाँग आणि कुडता स्वेटर्स आले असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.

0 Comments: