माजी नगरसेवक महेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गरिबांना जेवण
डोंबिवली ( शंकर जाधव ) भाजपचे माजी नगरसेवक महेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पल्लवी महेश पाटील, सुजित नलावडे, सिकंदर मकानी,नितीन कोळी, दत्ता वाठोरे यांच्यासह अनेक जन दरवर्षी सामाजिक उपक्रम राबवीत असतात.पाटील यांचा वाढदिवस ३ डिसेंबर रोजी असून यादिवशी डोंबिवली शहर आणि आजुबाजुकडील अनेक परिसरात सामाजिक उपक्रम राबविले जातात.मैत्री चॅरीटेबल ट्रस्टमध्ये फळे वाटप, पालीकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात फळे वाटप, स्टेशनपरिसरात रिक्षाचालकांना जेवण तसेच मानव चॅरीटेबल ट्रस्टला एक बेड आणि डोंबिवली पूर्वेकडील पांडुरंगवाडी येथील गुरुकृपा विकास संस्था या पालिकेच्या निवारा केंद्र येथे असा दिवसभराचा कार्यक्रम आहे.




0 Comments: