प्रदूषणमुक्त  डोंबिवली औद्योगिक वसाहत ठेवणे हे कामा संघटनेचे आणि सरकारी अधिकाऱ्यांचे उद्दिष्ट..  -देवेन सोनी

प्रदूषणमुक्त डोंबिवली औद्योगिक वसाहत ठेवणे हे कामा संघटनेचे आणि सरकारी अधिकाऱ्यांचे उद्दिष्ट.. -देवेन सोनी

 प्रदूषणमुक्त  डोंबिवली औद्योगिक वसाहत ठेवणे हे कामा संघटनेचे आणि सरकारी अधिकाऱ्यांचे उद्दिष्ट.. -देवेन सोनी

 

डोंबिवली ( शंकर जाधव ) याआधी  हिरवा पाउस आणि गुलाबी रस्ता यामुळे डोंबिवली औद्योगिक भाग राज्यात चर्चेचा विषय बनला होता. शुक्रवारी सकाळी एमआयडीसी परिसरातील कल्याण शिळ मार्गावर असलेल्या सर्विस रोडवर निळ्या रंगाचे पाणी अशी चर्चा रंगली होती. याबाबत कामा संघटनेचे अध्यक्ष देवेन सोनी म्हणाले,परंतु यात कोणत्याही कंपनीची चूक नव्हती. सध्या डोंबिवली औद्योगिक वसाहतीत एकूण तीन ते चार वेगवेगळ्या एजन्सीना  महामंडळाने कामे दिली आहेत. त्यात  पामुख्याने  रस्त्यावरील पथदिवे,  महानगर गॅस , नविन पाण्याची लाईन,  काही ठिकाणी ड्रेनेज लाईन दुरुस्ती असे आहेत. आठवडय़ातून किमान चार ते पाच दिवसात प्रत्येक भागात खोदकामामुळे जमिनीअंतर्गत  विजकेबल्स तुटत असतात. त्या जोडल्या जातात,उत्पादन बंद होते. अशाच प्रकारे पाण्याच्या पाईपलाईन तुटत असतात,जोडल्या जातात. अशाच प्रकारे शुक्रवारी देखील ड्रेनेजची लाईन तुटली.स्वाभाविकपणे आतील पाणी रस्त्यावर आले.सदर पाणी सीईटिपी केंद्राकडे वाहून नेणाऱ्या पाईपलाईनमधून बाहेर आले. आपल्याकडे टेक्स्टाईल उद्योग असल्याने विविध रंगाचे कापड असते, म्हणून रंगही असतो आणि तेच पाणी प्रदूषणमुक्त करून सीईटिपीला पाठवले जाते. ही बाब लक्षात आल्यानंतर त्वरित संबंधित एजन्सीकडून आणि कामा पदाधिकाऱ्यांकडून यावर धावपळ  करून पाईप लाईन जोडण्यात यश मिळवले. सदर पाण्याला कोणत्याही प्रकारचा वास येत नव्हता किंवा त्यापासून त्रासही होत नव्हता. उद्योग आणि उद्योजक तसेच संघटना आणि संबंधित खात्याचे अधिकारी यावर व्यवस्थित लक्ष देत असतात.  कधीतरी असे घडते आणि खरं म्हणजे तेही घडायला नको पण अपघात हा अपघातानेच घडतो.  प्रदूषणमुक्त  डोंबिवली औद्योगिक वसाहत ठेवणे हेच संघटणेचे आणि सरकारी अधिकार्याचे उद्दिष्ट आहे.

0 Comments: