वाढीव वीज बिलांविरोधात रिपाईचा धडक आक्रोश मोर्चा
डोंबिवली ( शंकर जाधव ) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) डोंबिवली शहराध्यक्ष अंकुश गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली कार्याध्यक्ष माणिक उघडे आणि सचिव समाधान तायडे कार्यकत्यांसह आक्रोश मोर्चा गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास २४ वीज वितरण कंपनीवर वाढीव वीज बिलाच्या विरोधात धडकणार आहे. मोर्चेकरी वाढीव बिलाची होळी करून वितरण अधिकाऱ्यांना जाब विचारणार आहेत.रिपाईचे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी यापूर्वी मोर्चा काढून कार्यकारी अभियंता यांना यासंदर्भात निवेदन दिले होते.पुन्हा एकदा रिपाईच्या आक्रोश मोर्चा पूर्वेकडील मध्यवर्ती कार्यालयापासून सुरु होणार असून बालभवन मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करून महावितरण कार्यालयावर धडक देणार आहे.




0 Comments: