भाजपच्या वतीने जेष्ठ नागरिकांना भगवदगीता भेट
डोंबिवली ( शंकर जाधव ) माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती व श्रीमद भगवदगीता जयंतीचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी डोंबिवली पश्चिम मंडल कार्यालयात जेष्ठ नागरिकांना भगवदगीता या पवित्र ग्रंथ देण्यात आले. यावेळी आमदार रवींद्र चव्हाण, कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे व माजी कल्याण जिल्हा माजी अध्यक्ष दिनेश तावडे, कल्याण जिल्हा सरचिटणीस प्रज्ञेश प्रभुघाटे यांच्या शुभ हस्ते भेट देण्यात आले.याप्रसंगी डोंबिवली पश्चिम मंडल अध्यक्ष प्रदीप चौधरी, महिला अध्यक्षा मोर्चा विद्या म्हात्रे, मिहीर देसाई अध्यक्ष, कल्याण जिल्हा युवा आघाडी सरचिटणीस पवन पाटील , डोंबिवली पश्चिम मंडल युवा आघाडी अध्यक्ष कृष्णा पाटील अध्यक्ष, डोंबिवली पूर्व मंडल युवा आघाडी मितेश पेणकर अध्यक्ष, डोंबिवली पश्चिम मंडल पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.




0 Comments: