स्वावलंब दिव्यांग विकास संस्थेने दिला दिव्यांगांना  आधार

स्वावलंब दिव्यांग विकास संस्थेने दिला दिव्यांगांना आधार

 स्वावलंब दिव्यांग विकास संस्थेने दिला दिव्यांगांना  आधार 



 (भांडूप-प्रदीप कासुर्डे, जागतिक अपंग दिन) 

-कोरोना महामारीचे  संकट संपूर्ण जगात आलं आणि होत्याच नव्हतं झालं. मार्च २०२० पासून सारा देश लॉकडाउन झाला. सारे कामधंदे, व्यवसाय,सारं काही बंद झालं आणि घरात बंदिस्त होण्याची वेळ आली.

अशा काळात एखाद्या धडधाकट व्यक्तीसमोर आता खायचे काय?जगायचे कसे ?  हा प्रश्न आ वासून उभा होता. ही झाली सर्वसामान्यांची  परिस्थिती.यापेक्षा भयंकर परिस्थिती तर दिव्यांग बांधवांची  झाली होती. 

दिव्यांगांची  तर जगण्यासाठी लढाई ही रोजचीच आहे. त्यातूनही ते छोटेमोठे काम करून कोणाकडे ही  हात न पसरता  स्वाभिमानाने जीवन  जगतात. 

परंतु यावेळची परिस्थितीच  विपरीत होती काहीच करता येत नव्हतं अशावेळी स्वावलंब दिव्यांग विकास संस्था  देवासारखी धावून आली आणि भांडूप कांजूर  विभागातील ६०ते ७०  दिव्यांग  बांधवांना महिन्याला जीवनावश्यक वस्तू पुरवू लागली. आजही ही  संस्था दान शूर व्यक्ती, विविध संस्था यांच्याकडून  या पदरचे  पैसे काढून   अन्नधान्य पुरवीत आहे.मुखी घास आणि दिव्यांग  बांधवांना सक्षम करण्याचे कार्य प्रामाणिकपणे  करीत आहे.

यात संजय नवरंग सुरेश भवार सुजित जाधव

निलेश लांजवल पंकज बोरवणकर, अर्जुन उघडे हे सर्व पदाधिकारीव इतर सदस्य  दिव्यांग बांधवांसाठी एकनिष्ठपणे कौतुकास्पद कार्य करीत आहेत.जागतिक अपंग दिनाच्या निमीत्ताने या संस्थेस लाख लाख सलाम.

0 Comments: