डोंबिवलीतील अतिधोकादायक इमारतीचा सज्जा कोसळला...

डोंबिवलीतील अतिधोकादायक इमारतीचा सज्जा कोसळला...

 डोंबिवलीतील अतिधोकादायक इमारतीचा सज्जा कोसळला...



          दोन महिला किरकोळ जखमी...  

डोंबिवली ( शंकर जाधव ) येथील पश्चिमेकडील महात्मा फुले रोडवरील महेश भूवान या अतिधोकादायक इमारतीच्या दुसरऱ्या मजल्यावरील सज्जा कोसळला. शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या घटनेत सदर इमारतीच्या बाजूकडील रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीवरील दोन महिला किरकोळ जखमी झाल्या. त्याच्यावर जवळील दवाखान्यात उपचार करण्यात आले.या इमारतीत कोणीही राहत नसून तळमजल्यावर तीन गाळे सुरु होते.इमारतीतील तील गाळे रिकामे करण्यात येणार असून हि इमारत जमीनदोस्त करण्यात येणार आहे.

  तळ अधिक दोन मजली असलेली महेश भुवन इमारत सुमारे ४० वर्ष जुनी आहे.पालिकेच्या `ह`प्रभाग क्षेत्र कार्यालयाकडून इमारतीचे  मालक महेश राउत यांना इमारती  अतिधोकादायक असल्याची नोटीस बजावली होती.शुक्रवारी दुपाच्या सुमारास सदर इमारतीचा सज्ज अचानक कोसळला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी दुचाकीवरील दोन महिला किरकोळ जखमी झाल्या.तर तळमजल्यावर महावीर पेपर मार्ट,महावितरण अधिकृत वीजबिल भरणा केंद्र आणि दुकान होते.घटना घडल्यावर घटनास्थळी पथकप्रमुख विजय देशमुख यासह अनेक कर्मचारी वर्ग आणि विष्णूनगर पोलीस दाखल झाले. या इमारतीतील एक गाला राजाराम यादव यांनी पागडीवर घेतला होता.इमारत जमीनदोस्त करण्याआगोदर पालिका प्रशासनाकडून लेखी आश्वासन दिल्याशिवाय गाळा रिकामा करणार नाही आशी भूमिका मीना यादव यांनी घेतली. काही ववेळाने प्रशासनाने त्यांची समजूत काढत तुम्हाला न्याय मिळेल असे आश्वासन दिले. त्यानंतर यादव कुटुंबीयांनी गाळा रिकामा केला.

चौकट

पालिका हद्दीतील धोकादायक इमारती

 `अ`प्रभाग क्षेत्र – धोकादायक इमारत ४ ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या ५ )

 `ब`प्रभाग – धोकादायक इमारत ११ ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या १२६ )

 `क`– धोकादायक इमारत ५४ ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या ३२२ )

 `जे`- धोकादायक इमारत ३२ ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या २८५ )

 `ड`- धोकादायक इमारत १ ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या ८ )

 `फ`- धोकादायक इमारत १४४  ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या २०१६)

 `ह`- धोकादायक इमारत २५ ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या २९२ )

 `ग`- धोकादायक इमारत ८ ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या २४४ )

 `आय`- धोकादायक इमारत ० ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या ०)

 `इ`– धोकादायक इमारत ५ ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या ० )

एकूण – धोकादायक इमारत २८४ – कुटुंबांची संख्या ३२९८

पालिका हद्दीतील अतिधोकादायक इमारती

 `अ`प्रभाग क्षेत्र – अतिधोकादायक इमारत २ ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या ३ )

 `ब`प्रभाग – अतिधोकादायक इमारत  १० ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या ११२ )

 `क`– अतिधोकादायक इमारत १०२ ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या ११२७ )

 `जे`- अतिधोकादायक इमारत  २ ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या ० )

 `ड`- अतिधोकादायक इमारत  ६ ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या ६१ )

 `फ`- अतिधोकादायक इमारत १६  ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या २२४ )

 `ह`- अतिधोकादायक इमारत १५ ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या २८३  )

 `ग`- अतिधोकादायक इमारत ३२  ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या २५३   )

 `आय`- अतिधोकादायक इमारत ० ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या ०  )

 `इ`– अतिधोकादायक इमारत  २ ( राहणाऱ्या कुटुंबांची संख्या १०७  )

एकूण अतिधोकादायक इमारत   १८७ - कुटुंबांची संख्या २१७०

 

0 Comments: