कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर
डोंबिवली ( शंकर जाधव ) कोरोनाची भीती काढून टाकण्यासाठी तसेच कोरोन विषयी प्रबोधन व जनजागृतीसाठी तसेच कोरोना रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांच्या मदतीसाठी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे कोरोना समुदेशन समिती( नियोजित ) (कल्याण-डोंबिवली महानगरपालिका) च्या वतीने कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे उद्या आयोजन उद्या रविवार ६ डिसेंबर रोजी रोजी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यत डोंबिवली पश्चिमेकडील रेल्वे स्थानकाजवळील एव्हरेस्ट सभागृहात आयोजन केले आहे.या शिबिरात कोरोना होऊ नये म्हणून घ्यावयाची काळजी या विषयावर डॉ. आनंद हर्डीकर आणि इम्युनिटी व आहार या विषयावर डॉ. रुपाली वानखेडे हे मार्गदर्शन करणार आहेत अशी माहिती समितीचे अध्यक्ष अनिल काकडे यांनी दिली.




0 Comments: