स्व. शिवाजी शेलार यांच्या पुण्यतिथीदिनानिमित्त अभिवादन सभा
डोंबिवली ( शंकर जाधव ) स्व.शिवाजी शेलार यांच्या चौथ्या पुण्यतिथीदिनानिमित्त डोंबिवली पूर्वेकडील शेलार चौक येथे त्यांच्या स्मृतींंना उजाळा मिळावा म्हणून अभिवादन सभेचे आयोजन केले होते..या सभेत माजी मंत्री तथा आमदार रविंद्र चव्हाण यांसह भाजप कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे,माजी नगरसेविका शिल्पा शेलार, माजी नगरसेवक साई शेलार, युवा मोर्चा पदाधिकारी सिद्धार्थ शेलार,श्रद्धा जोशी, डोंबिवली शहर पूर्व मंडल सचिव राजू शेख, वॉड अध्यक्ष अमोल तायडे, माजी वॉड अध्यक्ष कपिलदेव शर्मा यासह दिलीप भंडारी, कृष्णा गड्डू,चंद्रकांत पगारे,दत्ता वाठारे,रुपेश पवार आणि उपस्थित नागरिकांनी स्व.शिवाजी शेलार यांना श्रद्धांजली वाहिली.
यावेळी शेलार कुटुंबीयांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.तर उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणात स्व.शिवाजी शेलार यांच्या समाजकार्याची माहिती दिली.आमदार रविंद्र चव्हाण म्हणाले, झोपडपट्टी तंटामुक्त असावी हे स्वप्न आपण सर्वजन पूर्ण करू.स्व.शिवाजी शेलार हे अनेक विषयाला न्याय देणारे होते.आज चार वर्ष उलटली तरीही त्यांची आठवण प्रत्येकाला येते. स्व. शिवाजी शेलार हे उत्तम खेळाडू म्हणून सर्वाना परिचित होते.अश्या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. त्यावेळी रेल्वे पोलीस फोर्सने त्रिमूर्तीनगर आणि इंदिरानगर झोपडपट्टीवर बुलडोझर फिरवण्यास आले होते.त्यावेळी शिवाजी शेलार यांनी यांची घरे वाचविली.आम्हीही त्यांच्याबरोबर लोकांची घरे तोडली जाऊ नये म्हणून रस्त्यावर उतरलो होतो. येथील झोपडपट्टीतील नागरिकांना २ लाखापेक्षा जास्त कर आकारल्याबद्दल येथील सत्ताधारी पक्षाला जाब विचारला पाहिजे.या अभिवादन सभेच्या माध्यमातून सांगू इच्छितो कि, आजही आपल्यात स्व.शिवाजी शेलार जिवंत आहेत.कल्याण जिल्हा अध्यक्ष कांबळे यांनी आपल्या भाषणात स्व.शिवाजी शेलार हे गोरगरिबांच्या समस्या सोडवण्यासाठी जात असल्याचे सांगितले.






0 Comments: