डोंबिवलीत कच्छ युवक संघातर्फे भव्य रक्तदान शिबीर

डोंबिवलीत कच्छ युवक संघातर्फे भव्य रक्तदान शिबीर

 डोंबिवलीत कच्छ युवक संघातर्फे भव्य रक्तदान शिबीर


डोंबिवली ( शंकर जाधव )  कच्छ युवक संघ डोंबिवली शाखा माध्यमातून श्री डोंबिवली मित्र मंडळ शिक्षा संस्थान यांच्या सहयोगातून तसेच एंकरवाला रक्तदान अभियान अंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबीर रविवार १३  डिसेंबर रोजी सकाळी ८  ते  संध्याकाळी ५  दरम्यान होणार आहे. पूर्वेकडील के.बी. वीरा हायस्कूल येथे होणाऱ्या रक्तदान शिबिरात ‘रक्त दान हे श्रेष्ठ दान’ या घोषवाक्यानुसार रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. रक्तदात्यांना आकर्षक भेट देण्याचेही संस्थेने ठरविले आहे. संयोजक राजेश लालजी मारू, सह-संयोजिका चारूल जतीन मारू असून सहयोगी दाता मातुश्री जवेरबेन खुशालचंद गंगर (दुर्गापूर-नववास, कच्छ), प्रमुख पाहुणे अखिल कच्छी राजगोर महासभा प्रमुख प्रकाश वीरजी गोर, विशेष अतिथी अंबिका ड्रायफुट-डोंबिवलीचे मातोश्री दमयंतीबेन लक्ष्मीचन्द बागडा उपस्थित राहणार आहेत. रक्तदान शिबीर दरम्यान कोरोना संक्रमण होणार नाही याची काळजी घेऊन सेनीटायझेशन, सुरक्षा तसेच सरकारी निर्देशांचे पालन करण्यात येणार आहे अशी माहिती एलेश भवानजी धरोड यांनी दिली आहे. अधिक माहितीसाठी 9820260333, 9619895506 या मोबाईलवर क्रमांकावर संपर्क साधावा.

0 Comments: