सुसंघटनेच्या अभावानेच अत्याचार.
भारतात राहणाऱ्या विशिष्ट मानवी समूहाला इतिहासात अत्याचाराला सामोरे जावे लागले होते. तत्कालीन अनेक कारणांपैकी एक कारण म्हणजे सुसंघटनेचा अभाव सांपत्तिक बाबतीत वरचढ, शिक्षणाचे प्राबल्य, माहिती प्रवण क्षेत्र प्रभावी असलेल्या मूठभर लोकांनी आपल्या बुद्धी व चातुर्याच्या जोरावर अज्ञानाचा अभाव तसेच सुसंघटनेच्या अभाव असलेल्या लोकांवर अमानुष अत्याचार केल्याच्या घटना गतकाळात झाल्याचे आपल्या निदर्शनास येऊ शकतात.
एका विशिष्ट विचारधारेच्या लोकांनी एक समद्वेश जण समूहाचा अवैचारिक, काही प्रमाणात अज्ञानी, धर्माधिष्ठित ,जीर्णमतवादी ,लोकांचा समूह तयार करण्यात यशस्विता संपादन केली. मानव लिखित ,मानव कल्पनधिष्ठीत, मानव स्वप्नाधारित, अस्तित्वात नसलेल्या शक्तींचा धाक दाखवून विखुरलेल्या ज्ञानाचा अभाव , शिक्षणाचा अभाव, संपत्तीचा अभाव, मार्गदर्शनाचा अभाव, असलेल्या लोकांवर अत्याचार करण्यात यशस्वी झालेले आहेत.
सुसंघटनेच्या अभावाने आपण अत्याचारकर्ती जन्मातला कमजोर , लाचार, दुबळी करु शकत नाही ,आणि जोपर्यंत अत्याचारकर्ती जमात कमजोर होत नाही तोपर्यंत आपल्याला आपले सामाजिक ,राजकीय तथा मानवी अधिकार मिळणार नाही व आपल्यावर अन्याय होत राहतील, म्हणून अत्याचार रोखण्यासाठी सुसंघटित होणे फार आवश्यक आहे.
बुद्धपूर्व काळात देखील सुसंघटन नसलेल्या लोकांवर अन्याय झाल्याच्या घटना घडलेल्या आहेत. तथागत बुद्धाने गृहत्याग केल्यानंतर अनेक काळपर्यंत ज्ञानसंपादन ,मार्गक्रमण करत असताना त्यांच्या देखील अनेक उपदेशांमधून स्पष्ट जाणवत असलेली गोष्ट जर कोणती असेल तर आपल्या जवळ असलेले ज्ञान आपण सुस्थितीत लोकांना एक संघाच्या माध्यमातून देऊ शकू. तथागत बुद्धांचा संघ म्हणजे बुद्धांच्या विचारातून तयार झालेली सुसंघटना होय . तथागत बुद्धांनी संघाच्या माध्यमातून जवळपास तीस वर्षात क्रांती करून टाकली होती . जी सुसंघटना तथागतांच्या निर्वाणानंतर सुद्धा अनेक दिवस टिकून होती. लोकांना बौद्धिक, सांघिक , क्षमाशिल विचारसरणीने बांधून ठेवण्याची क्षमता त्यात होती . वास्तविक तथागत बुद्धाची शिकवण बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर तीन ते पाच शतकापर्यंत लिहिली गेली नव्हती ,परंतु तथागतांनी श्रावक संघामार्फत सुसंघटन बांध मजबूत पद्धतीने बांधले होते .
काही वेळेस सुसंघटित अल्प समूहाकडून बहुसंख्य असंघटित लोकांवर अन्याय व अत्याचार होत असतात जगात विसाव्या शतकात म्हणजेच 1919 मध्ये मुसोलिनीने देखील फॅसिझम नावाचे तसेच त्याच जवळपास काळात 1920 मध्ये नाजीवाद हिटलरच्या काळात तयार झालेल्या या देखील अगोदर छोट्याशा संघटना होत्या. दोन्ही नेत्यांची विचारसरणी ही हुकूमशाही प्रवृत्तीची, लोकशाहीला मारक ,मानव सृजनशिलतेला मारक असल्याकारणाने जगाला या वृत्तीचा भयंकर परिणाम भोगावा लागला होता. हिटलर व मुसोलिनी मध्ये प्रखर असे संघटन बांधण्याचे ,लोकांचे डोके भडकवण्याचे गुण होते परंतु त्यांनी आपल्या उपजत गुणांचा सुसंघटन बांधण्यासाठी उपयोग केला नाही. वरील गुणांचा मुसोलिनी आणि हिटलर यांनी सुसंघटना बांधण्यासाठी उपयोग केला असता तर जगातील बहुतेक लोकांना त्यांच्या अत्याचाराला बळी पडावे लागले नसते.
समाजजीवनात बुद्धीजीवी वर्गाची उणीव नाही परंतु नुसते बुद्धिजीवी होऊन काहीही उपयोग नाही जोपर्यंत सुसंघटन बनत नाही तोपर्यंत अन्याय होत राहतील. काही वेळेला बुद्धिजीवी मध्ये अहंभाव निर्माण होत असतो व तो संघटन बांधणी कडे लक्ष देत नाही त्यामुळे अपयशी होत असतो. सुसंघटन मध्ये अंतर्गत व बाह्य दोन्ही ठिकाणी विचारविनिमय होणे आवश्यक आहे. या दोन्ही ठिकाणाच्या विचारविनिमयातून आपल्याला नव- नवीन प्रकारच्या समस्यांची माहिती मिळत असते व त्या आधारावर विचार करून समस्या निराकरणासाठी उपाय योजना तयार करण्याचे नियोजन केले जाऊ शकते व अत्याचाराला आळा घालण्यासाठी स्वाभिमानाची ज्योत कायम तेवत ठेवून सुसंघटित राहून अन्यायाविरुद्ध झगडत राहता येत असते .नुसती संघटना असून चालत नाही तर सुसंघटना हवी व तिच्यात नेहमी स्वाभिमानाचा अग्नि प्रज्वलित राहिला पाहिजे.
उद्देश पुर्तीसाठी लोकशाही पद्धतीने तयार केलेली सुसंघटनेची आवश्यकता असते. सुसंघटनेच्या माध्यमातून आपण दुसऱ्यावर सकारात्मक दबाव बनवू शकतो ,त्याला कारण सामूहिक पद्धतीने घेतलेला निर्णय हा नव्यांनव टक्के ( 99% ) योग्य ठरत असतो तर फक्त अपवादात्मक परिस्थितीत तो निर्णय अपयशी ठरत असतो. सुसंघटन जर असेल तर समाजात विचारधारा घेऊन जाता येत असते व समाजात वाईट व इतरांना मारक गोष्टी आहेत त्यांना नेस्तनाबूत करता येते. सुसंघटन हे काही वेळेस अदृश्य असते परंतु ते कार्य करणाऱ्याच्या कृतीतून दिसत असते व त्या कृतीचा सर्वदूर परिणाम दिसून येत असतो. जोपर्यंत सुसंघटन गावा- गावात जात नाही तोपर्यंत अत्याचार, मानवी मूल्यांचे हरण, मानवी अधिकारांचे हनन होत राहील यात दुमत असू शकत नाही.
दिनांक. 12 /12/ 2020
10 अश्विनी पार्क वाघोदा शिवार नंदुरबार .
हेमकांत मोरे.
94 23 91 70 74
94 04 49 24 03




0 Comments: