डोंबिवलीत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या समर्थनार्थ झळकले बॅनर..
शिवसेना नेते खासदार संजय राऊत ईडी च्या रडारवर आले आहेत ,पीएमसी बँकेतील एका कथित घोटाळ्याप्रकरणी संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीने नोटीस बजावण्यात आली आहे .या प्रकरणानंतर राऊत यांनी काल पत्रकार परिषदेत भाजप नेत्यावर टीका केली होती .ईडी प्रकरणावरून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत भाजपवर टीकेची झोड उठवली आहे .आज डोंबिवली मध्ये स्टेशन परिसरात शिवसैनिकानी संजय राऊत यांनी भाजप नेत्यांविरोधात केलेल्या विधानाचे बॅनर झळकावले असून राऊत याना पाठिंबा दर्शवला आहे.
( डोंबिवली प्रतिनिधी - शंकर जाधव )







0 Comments: