महामानवास काव्यसुमनांची आदरांजली

महामानवास काव्यसुमनांची आदरांजली

 महामानवास काव्यसुमनांची आदरांजली 



मुंबई- महामानव ,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त साहित्य जागर मंच मुंबई  आयोजित ऑनलाईन कविसंमेलना द्वारे महामानवास काव्यासुमनांनी आदरांजली वाहण्यात आली.या संमेलनाची सुरुवात महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून करण्यात आली.यानंतर सर्व कवींचा  परिचय होवून  कविसंमेलनास  सुरुवात झाली.महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील अगदी गोंदिया पासून ते सांगली पर्यत आणि नाशिक ते नांदेड पर्यत तसेच  गोवा येथील ही कवी या संमेलनास  उपस्थित होते.बाबासाहेब यांचे जीवन, संघर्ष , संदेश , संविधान निर्मिती कार्य , सामाजिक कार्य , लेखन, बौद्ध धर्माची दिक्षा, संविधान मूल्य , 

दिनदुबळ्याचा कैवारी, ज्ञानाचे प्रतिक अशा विविध विषयावर सुंदर अशा रचना कवींनी सादर केल्या.सतीश येनभुरे,राजकुमार म्हैसके,नंदकिशोर कदम,प्रांजली काळबेंडे,महेंद्र कोल्हटकर,कलावती कोल्हटकर,राजू गडहिरे,प्रथमेश भामरे,निकिता चावडा,प्रितम देवतळे,पूजा शिरगुप्पी, चैतन्या नरवाडे, सिद्धेेश्वर वायाळ,नागनाथ लोंढे,किशोरकुमार बनसोड,सौरभ आहेर,पोपट निकम,आकाश पाटोळे, गोविंद वाकळे, लिलाधर महाजन, किर्ती बुटानी या कवींनी संमेलनात भाग घेवून आपल्या स्वलिखित रचना सादर केल्या. संमेलनाचे आयोजक व निवेदक प्रदीप कासुर्डे सर यांचे सर्वानी आभार मानले 

आभारप्रदर्शचा कार्यक्रम  किर्ती बुटानी व लिलाधर महाजन सर यांनी सुंदररित्या पार पाडला.अशारीतीने उत्साहात व महामानवाच्या आठवणीत कविसंमेलन उत्तमरित्या पार पडले.

1 comment