भाजपा नगरसेवक विश्वदीप पवार यांच्या प्रभागात विकास कामे
डोंबिवली ( शंकर जाधव ) भाजपचे नगरसेवक विश्वदिप पवार यांच्या प्रभाग क्र.६९ शिवमार्केट येथील दोन रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाचा शुभारंभ आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला.नगरसेवक विश्वदिप सुभाष पवार व श्रद्धा विश्वदीप पवार व प्रभागातले स्थानिक रहिवाशी उपस्थित होते. शिवमार्केट प्रभागातील आगरकर क्रॉस रोड (हिंदी स्कूल) आणि मौलाना आझाद रोड ह्या दोन रस्त्याचे क्राँकिटीकरण व्हावे याकरिता नगरसेवक पवार यांनी पालिकेकडे पाठपुरावा केला होता. या दोन रस्त्याचा कामासाठी ५० लाख आणि ४२ लाखांचा असा एकूण ९२लाखांचा निधी पालिकेने मंजूर केला आहे. गेली अनेक वर्षे या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याची मागणी नागरिकांनी करीत होते. कडोंमपा हद्दीतील सर्व रस्ते सिमेंट क्रॉकीटीकरणाचे झाले पाहिजे. रस्त्यामधील खड्डे हे गेल्या अनेक वर्षापासूनची समस्या आहे. कोविड काळात अनेक विकासकामे थांबली होती. पण आता या कामाला सुरूवात झाली असल्याने आता हा प्रश्न संपुष्टात येईल, असे मत भाजपा आमदार रविंद्र चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केले.





0 Comments: