नशाबंदी मंडळातर्फे महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनपर गीते व व्यसनमुक्तीची शपथ घेऊन आदरांजली

नशाबंदी मंडळातर्फे महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनपर गीते व व्यसनमुक्तीची शपथ घेऊन आदरांजली

 नशाबंदी मंडळातर्फे महामानव डॉ .बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनपर गीते व व्यसनमुक्तीची शपथ घेऊन आदरांजली

 

डोंबिवली ( शंकर जाधव ) महामानवडॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याच्या वतीने व्यसनमुक्तीच्या विचारांवर चालण्याची प्रतिज्ञा घेऊन आदरांजली वाहण्यात आली.यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे पणतू राजरत्न आंबेडकर यांनी सदर वेबिनार द्वारा समस्त भारतीयांना 'निर्व्यसनीराहण्यासाठीची सामूहिक प्रतिज्ञा दिली.डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर बौद्ध बांधवाना २२ प्रतिज्ञा दिल्याज्यामध्ये १७ वी प्रतिज्ञा 'मी दारू पिणार नाह अशी असून याद्वारे व्यसनमुक्तीसाठीचा सल्ला दिला होता. 

      दरवर्षी लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमी येथे बाबासाहेबांना  अभिवादन करण्यासाठी येतात असतात. परंतु यावर्षी कोरोना महामारीमुळे विविध प्रकारे ऑनलाईन माध्यमाद्वारे अभिवादन आकारण्यात येत आहे.नशाबंदी मंडळाद्वारे सादर वेबिनार मध्ये व्यसनांवर निर्बंध आणणारे संविधानाचे कलम ४७ ची अंमलबजावणी व प्रचार हेतू माहिती देण्यात आली.नशाबंदी मंडळाचे चिटणीस,मुख्य संघटक अमोल स.भा.मडामे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे व्यसनमुक्ती वर वास्तविक विचार मांडून उपस्थितांना मार्गदर्शन केले. नशाबंदी मंडळाद्वारे डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादनपर गीतांच्या माध्यमातून आदरांजली वाहण्यात आली. यावेल्ली गायिका ज्योती चौहान यांनी 'भीमा घे मानवंदना,प्रगती कि राहशाहिरा गार्गी कदम यांनी 'भहिमराया घे तुला या लेकरांची वंदनासारखी अप्रतिम गाण्यांचे सदारीक्करं केले. श्रद्धा गमरे यांनी नशाबंदी मंडळाचा संदेशपार गीतांचे सादरीकरण करून अभिवादन केले. यावेळी वेबिनारची प्रस्तावना अर्पिता मुंबरकर यांनी केली.बिस्मिल्ला सय्यद शब्बीर यांनी आभार प्रदर्शन तर सुनिल चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

 


0 Comments: