कविता : स्नेहमेळावा दिन
असाच पुन्हा पुन्हा घडूनि यावा स्नेहमेळावा ।
जुन्या नव्या आठवणीने पिसारा मनाचा फ़ुलावा ।। धृ।।
बालपणीचे ते दिन, पहा होते किती छान ।
हुतुतू,विटी-दांडू खेळुन,गाजवित होतो माळरान।।
त्या आठवणी जागविण्याशी असा घडावा स्नेहमेळावा ।।१।।
जुन्या नव्या आठवणीने पिसारा मनाचा फ़ुलावा
गुरुजी धडा शिकविता ध्यान नव्हते वर्गात
कधी सुळकी उडी मारावी जाऊन नदीच्या कोंडात
त्या आठवणी जागविण्याशी असा घडावा स्नेहमेळावा ।।२।।
जुन्या नव्या आठवणीने पिसारा मनाचा फ़ुलावा
गाई-गुरांना चाराया जायचो डोंगर दऱ्यात ।
मित्रांच्या संगतीने पावा घुमवायचो आसमंतात।।
त्या आठवणी जागविण्याशी असा घडावा स्नेहमेळावा ।।३।।
जुन्या नव्या आठवणीने पिसारा मनाचा फ़ुलावा
कवी संतोष गोपाळ सावंत
उर्फ हरिसंतोष
10/12/2020 (8779172824)
(जुन्या मित्र मंडळीचे स्नेहमेळाव्याचे फोटो पाहुन सुचलेली कविता)






0 Comments: