कोविड रुग्ण कमी होत असताना ठाण्यात आणखी दोन कोविड सेंटर सुरु का केले...
किरीट सोमय्या यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सवाल
डोंबिवली ( शंकर जाधव ) भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाणे जिल्ह्यातील कोविड सेंटरची पाहणी आणि येथील कर्मचाऱ्यांचे म्हणणे ऐकण्यासाठी भाजप नेते किरीट किरीट सोमय्या यांनी ठरविले आहे.याची सुरुवात शुक्रवारी डोंबिवली जिमखाना येथील कोविड सेंटरपासून केली.यावेळी आमदार रविंद्र चव्हाण,नगरसेवक मुकुंद पेडणेकर,निलेश म्हात्रे, भाजप डोंबिवली शहर पूर्व मंडळ अध्यक्ष नंदू जोशी यांसह अनेक कार्यकर्ते आणि प्रशासकीय हॉस्पीटल मॅनेजमेंटच्
डोंबिवली जिमखाना येथील कोविड सेंटरची पाहणी करण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या येणार असल्याने सेंटर बाहेर भाजप कार्यकर्ते आले होते. कोविड सेंटरची पाहणी करण्याआधी हे सेटर चांगल्या पद्धतीने काम करत असल्याचे सोमय्या यांना सांगण्यात आले. कामगारांचा पगार त्याच्या खात्यात जायला हवा होता. ठेकेदार कामगारांची फसवणूक करत आहे.त्यावेळी सोमय्या यांनी ठेकेदाराला नव्हे तर डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाचे कौतुक करत सन्मानपत्र देऊ असे सांगितले. काही वेळाने सोमय्या यांनी पीपीकिट घालून सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांची भेट घेऊन चौकशी केली.त्यानंतर पत्रकारांशी बोलताना सोमय्या म्हणाले,कोरोना रुग्णाचा आकडा कमी असताना ठाण्यात शिवसेनेने दोन नवीन कोविड सेंटर का सुरु केले याचे उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला द्यावे.कोविड सेंटर हे कोरोना रुग्णांसाठी आहे का ठेकेदारांसाठी आहे असा प्रश्नही उपस्थित करत कोविड सेंटर हे ठाकरे सरकारचे लक्ष असल्याचा आरोप केला.तर कोविड सेंटर येथील कर्मचारी वर्गाला पगार वेळेवर मिळतो कि नाही ? सेंटर मध्ये रुग्णांना योग्य उपचार मिळत आहे कि नाही ? याची पाहणीहि करण्यासाठी आलो आहे.शिवसेना आमदार प्रताप सरनाईक हे १०० कोटीचा अब्रू नुकसानीचा दावा टाकणार असल्याबाबत विचारले असता त्यांनी `हिम्मत असेल तर प्रताप सरनाईक यांनी माझ्यावर दावा टाकून दाखव,अश्या धमक्यांना भाजप घाबरत नाही असे ठामपणे सांगितले.प्रताप सरनाईक हे एक नंबरचे भष्ट्र व्यक्ती आहेत.ठाणे महानगरपालिकेने सरनाईक यांना संरक्षण दिले आहे. त्यांनी घोटाळा केला आहे.
चौकट
कोविड सेंटर मधील कर्मचारी रडले....
आमच्या व्यथा, समस्या मिडीयाला सांगितल्यातर आम्हाला मारहाण करण्याच्या धमक्या दिल्या जातात,आमचा पगार १५ हजार असताना १० हजार रुपये पगार दिला.कोविड सेंटर मध्ये रिक्स घेऊन काम करत असून आमची अशी अवस्था आहे असे डोंबिवली कोविड सेंटर मधील काही कर्मचारी वर्गानी भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या समोर मांडल्या. या समस्या मांडताना एका महिला कर्मचाऱ्यांचा संयमाचा बंध सुटला आणि त्या रडल्या.कर्मचाऱ्यांची समजूत काढत सोमय्या यांनी कोणावरही अन्याय होऊ देणार नाही असे सांगितले.तर ठेकेदाराला धाऱ्यावर घेत कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर आणि योग्य द्यावा अन्यथा ठेकेदाराचा ठेका रद्द करू असा इशारा दिला. याबाबत डॉ.समीर सरवणकर यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले, माझ्याकडे आतापर्यत कर्मचाऱ्यांनि कोणतीही तक्रार केली नाही.पंरतु कर्मचाऱ्यांनी आता केलेल्या तक्रारीबाबत सखोल चौकशी करू असे सांगितले.





0 Comments: