नरडवे धरणग्रस्तांचा संताप, पुन्हा धरणाचे काम केले बंद
(लोकसत्यवाणी न्युज )
नरडवे धरणग्रस्त समन्वय समिती मुंबई च्या पदाधिकारी यांनी ठाण्याचे आमदार रवींद्र फाटक यांच्या समवेत मंत्रालयात पालकमंत्री उदय सामंत व नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालय तेथे भेट घेऊन दि. ६ जाने २०२१ रोजी आठवण पत्र सादर केले होते. आठवणी करिता त्यांना सोबत मागण्यांचे निवेदन दिले होते.
मागील वर्षी १४ डिसेंबर २०२० च्या मीटिंगमध्ये ठरलेलं होते की, धरणग्रस्तांच्या ज्या मागण्या आहेत त्यांची लवकरच पूर्तता करण्यात येतील असे प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले होते.
धरणग्रस्तांचे पेमेंट, 65 टक्के रक्कम भरली त्याच्यासाठी शेतजमिन किंवा त्या बदल्यात रक्कम, तसेच ज्यानी 65 टक्के रक्कम भरली नसेल त्यांची रक्कम भरून घ्यावी, तसेच वाढीव कुटुंबाना मंजुरी द्यावी अशा प्रकारच्या मागण्यांचे निवेदन दिले गेले होते, यावेळी खासदार विनायक राऊत, वैभव नाईक, तसेच ऑनलाईन जिल्हा पोलिस अधीक्षक, तसेच सिधुदुर्गच्या जिल्हाधिकारी यांच्या समवेत ही बैठक १४ डिसेंबर २०२० रोजी संपन्न झाली होती, तेव्हा वरील धरणग्रस्तांच्या मागण्या,समस्या सोडवण्यासाठी प्रकल्प अधिकाऱ्यांनी २६ जानेवारी २०२१ पर्यंत सोडवू असे सांगून लास्ट मुदत मागितली होती. पण अध्याप अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची दखल न घेतली गेल्यामुळे व दिलेली आश्वासन न पाळल्यामुळे वैतागून 27 जानेवारी २०२१ ला चालत असलेले धरणाचे काम सर्वानुमते नरडवे प्रकल्पग्रस्तानी बंद केले आहे, आता पुन्हा एकदा मागण्यांचे निवेदन खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, उपविभागीय दंडाधिकारी कणकवली, नरडवे सरपंच, तसेच ठेकेदार चक्रधर कन्स्ट्रक्शन यांनाही पुन्हा या पत्राची प्रत देण्यात आली आहे.
अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही जाणीव पूर्वक अधिकारी मनमानी वागत असून फक्त धरणाचे काम पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करतात, मात्र प्रकल्प ग्रस्ताच्या पुनवर्सन,शेतजमीन,वाढीव कुटुंब, यांसारख्या प्रश्नांवर अध्याप पर्यंत गांभीर्याने घेतले जात नाही आहे.म्हणून हा निर्णय घेतला गेला आहे, असे मुंबई समितीचे अध्यक्ष सुरेश सहदेव ढवळ व सहकारी यांनी आमच्या प्रतिनिधी शी बोलताना म्हणाले.







0 Comments: