अयोध्येतील राममंदिर च्या निर्मितीसाठी डोंबिवलीतुनही निधी संकलनासाठी प्रारंभ
डोंबिवली (१५ जानेवारी २०२१)
डोंबिवली पश्चिमेला दीनदयाळ रोड येथील रामहनुमान मंदिरात आरती करून या निधी संकलनाच्या कामास प्रारंभ झाला आहे
या आरतीला भाजपचे आमदार माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण हे उपस्थित होते.
या आरतीचे आयोजन व निधी संकलनासाठी पुढाकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, संस्कार भारतीचे पदाधिकारी व भारतीय जनता पक्षाचे वतीने करण्यात आले.
या आरतीला डोंबिवलीतील अनेक भक्तांची उपस्थिती होती.
आपण रवींद्र चव्हाण यांनी या अयोध्येतील राम मंदिर मदतीसाठी 1 लाख 11 हजार 111 रु.ची देणगी जाहीर केली
आहे. उपस्थित जनसमुदायाला आमदार रवींद्रजी चव्हाण म्हणाले.व इतरांनीही स्वेच्छेने यथाशक्ती मंदिर उभारण्यासाठीच्या कामाला आपले योगदान द्यावे
तसेच डोंबिवलीतील काही कलाकारांनी मिळून स्वेच्छेने राम मनी आठवावा या विषयाला अनुसरून रामचरित्र वर आधारित कॅनव्हास वर काही कलाकारांनी चित्र रेखाटली आहेत. याबद्दल डोबिवली पश्चिम चे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकारिणी मंडळ सदस्य भूषण धर्माधिकारी यांनी कलाकारांचे कौतुक केले, त्यांनी कोणत्याही प्रकारचे मानधन घेतले नाही
तसेच डोंबिवली पश्चिमचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नगर कार्यवाहक प्रवीण माने यांनीही आपले मत मांडले ते म्हणाले घरोघरी स्वयंसेवक येतील अयोध्येतील रामंदिर निर्मितीच्या मदतीसाठी प्रत्यकाने स्वतःचे काहीतरी योगदान समजून , यथाशक्ती स्वेच्छेने निधी संकलनाच्या कामास मदत करावी असे ते म्हणाले
तसेच भागशाला मैदानात रांगोळीतुन उत्कृष्ट पद्धतीने श्री रामचंद्राची प्रतिमा साकारली आहे, यासाठी प्रामुख्याने दिनेश जाधव व इतर त्यांच्या सहकारी यांनी जागा उपलब्ध करून दिली
ही १५ बाय १५ फुटांची रांगोळी सकारण्यात आली आहे, ही रांगोळी २० किलो विविध रंग आणि ६० किलो पांढरी रांगोळी वापरण्यात आल्याची माहिती संस्कार भारतीचे उमेश पांचाळ आणि सहलाकारांनी सांगितले. अजून दोन दिवस रांगोळी पाहता येणार आहे असे समाजसेवक दिनेश जाधव यांनी सांगितले






0 Comments: