कविता
माझी तिळगुळ
माझी तिळगुळ तुला घे
तुझी तिळगुळ मला दे
माणुसकीचा झुला आपला
गगनी पुन्हा झुलू दे।
प्रकाश पाजळू दे नवा
गंध प्रेमाचाच हवा
निळ्या आभाळात पुन्हा
धावेल पाखरांचा थवा।
नभी झरू दे आता
पुरता चांदण्यांचा झोत
नात काळजात आपुल्या
भरून वाहू दे ओतप्रोत।
जाळुनी टाक विषन्नतेला
उदासीनतेचा घोट गळा
दुःखे सारी मातीत गाडूनी
फुलवू समतेचाच मळा।
कवी
अशोक कुमावत
(राष्ट्रपती पुरस्कार विजेते)
9881856327





0 Comments: