कविता- एवढे सोपे असायला काय हरकत नव्हती

कविता- एवढे सोपे असायला काय हरकत नव्हती

एवढे सोपे असायला काय हरकत नव्हती


कापावे डोकीचे केस

वा करावी गुळगुळीत दाढी


तसे दुःख झाडून टाकणे

सोपे असायला 

काय हरकत नव्हती


पायातील चप्पल काढावी

डोक्यातील टोपी काढावी


एवढे सोपे असायला 

काय हरकत नव्हती


हातावरील मच्छर झाडावा

किंवा एक ढेकर द्यावा


एवढे सोपे असायला 

काय हरकत नव्हती


नाहीतर करावी एक कविता दररोज

आणि दुःख व्हावे गायब


एवढे सोपे असायला 

काहीच हरकत नव्हती.



© डॉ सतीश पवार

कणकवली

0 Comments: