पालिका आयुक्तांकडे तक्रार केल्याच्या रागातून हल्ला

पालिका आयुक्तांकडे तक्रार केल्याच्या रागातून हल्ला

  पालिका आयुक्तांकडे तक्रार केल्याच्या रागातून हल्ला  

       केडीएमीसीच्या पालिकेच्या शिपायावर संशय

 

 

डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत नोकरी लावतो असे सांगत ५ लाख रुपये घेऊन नोकरी लावली नाही.याची तक्रार पालिका आयुक्तांकडे केल्याने बदली झाली याचा राग मनात धरून हल्ला झाल्याचा आरोप यशवंत चव्हाण यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखले केला आहे.या हल्ल्यात चव्हाण यांच्या डोक्याला मार लागला असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.चव्हाण या ह्ल्यामागे  पालिकेच्या एका शिपायाचा हात असल्याचा संशय पोलिसांकडे व्यक्त केला आहे.

     मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी साडे पाच वाजता यशंवत चव्हाण हे मोटरसायकलीवरून घरी जात असताना खांबाळपडा येथे आल्यावर तोंडावर रुमाल बांधून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी चव्हाण यांच्यावर लाकडी दांडक्याने हल्ला चढविला. या हल्ल्यात चव्हाण याच्या डोक्याला मार लागून ते जखमी झाले.हल्लेखोर मोटरसायकली धूम ठोकल्याने त्यांना ओळखता आले नाही. चव्हाण यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात तक्रार दाखल केली आहे. चव्हाण यांनी दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, माझे वडील भोला चव्हाण ( ६५ ) हे केडीएमसी सफाई कामगार म्हणून कामाला होते.त्याच्या जागी कामावर लावण्यासाठी माझ्या शेजारी केडीएमसी मध्ये शिपाई म्हणून कामाला असलेले किसन धावरी यांनी माझ्याकडून कामाला लावण्यासाठी ५ लाख रुपये घेतले.आज काम करतो उद्या करतो असे सांगून बरेच दिवस झाले पण त्याने काम केले नाही. त्याबद्दल त्यांना विचारले असता आमच्यात नेहमी बाचाबाची होऊन भांडणे होत होती.यासंदर्भात  कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज केला आहे तसेच पालिका देखील आयुक्तांना लेखी तक्रार केली होती. त्यामुळे  किसन धावरी यांची बदली करण्यात आली. त्याचा राग मनात धरून त्याने कृत्य केले असावे असा संशय आहे.   

0 Comments: