कर भरण्यासाठी २७ गावातील रहिवाश्यांनी काढले कर्ज

कर भरण्यासाठी २७ गावातील रहिवाश्यांनी काढले कर्ज

 कर भरण्यासाठी २७ गावातील रहिवाश्यांनी काढले कर्ज

 

डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट झालेल्या २७ गावातील रहिवाश्यांना चार वर्षापासून पालिकेने कराच्या पावत्या रहिवाशांना पाठवल्या नाहीत.लॉकडाऊनच्या काळात रोजगार गेले असताना पालिका प्रशासनाने चार वर्षांचा एकत्र कर भरण्यास सांगितले. एवढी मोठी कराची रक्कम भरण्यासाठी रहिवाश्यांना  कर्ज काढावे लागत आहे. गेले अनेक वर्ष २७ गावे पालिकेत रहावी की ग्रामपंचायतीत यासाठी संघर्ष सुरू आहे. २७ गाव संघर्ष समितीची वेगळी नगर परिषद करावी अशी मागणी होती. मात्र न्यायालयाने ही मागणी फेटाळत ही गावे महापालिकेत राहतील असे निर्देश दिले. त्यामुळे गावे पालिकेत आल्यानंतर पालिका अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घराच्या कराच्या पावत्या नागरिकांना पाठवल्या. तर ग्रामपंचायतीने केलेल्या चुकांची  दुरुस्ती न करताच पालिकेने रहिवाशांना कराच्या पावत्या पाठवल्या आहेत. विशेष म्हणजे एकाच व्यक्तीला दोन वेळा  कराच्या पावत्या पाठवल्याचे समोर आले आहे. याबाबत ग्रामपंचायतीने केलेल्या चुकांचा गोंधळ ई प्रभाग क्षेत्र कार्यालयात नीस्तरावा  लागत असल्याचे सांगितले.  चार वर्षात पालिका प्रशासन झोपा काढत होते का असा संतप्त प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

 

0 Comments: