मराठी माध्यमाच्या शाळेला कचरा व्यवस्थापनासाठी भाजप पदाधिकारी सुजित महाजन यांचे सहकार्य
डोंबिवली ( शंकर जाधव ) घरातून ओला-सुका कचरा वेगळा करून द्यावा अन्यथा दंड आकाराल जाईल तसेच रस्त्याच्या कडेला कचरा टाकताना सापडल्यास दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागेल असे पालिका प्रशासनाचे निर्देश आहेत.शहरातील शाळांनी हाच नियम लागू असल्याने शाळांनी सकारात्मक प्रतिसाद ददिला आहे. डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा फुले रोडवरील स्वामी विवेकानंद (अरुणोदय) शाळेने कचरा व्यवस्थापन करण्याचे ठरविले. त्यांच्या या कामात भाजप डोंबिवली पश्चिम मंडळ ओबीसी आघाडी अध्यक्ष सुजित महाजन यांनी मदतीचा हात पुढे केला.नवीन वर्षात या कामाला सुरुवात म्हणून भाजप डोंबिवली पश्चिम मंडळ ओबीसी आघाडी अध्यक्ष महाजन,भा.ज.पा.डोंबिवली पश्चिम मंडल प्रदीप चौधरी, विलास भोपतराव कोषाध्यक्ष यांच्या हस्ते संस्थेचे सदस्य रवींद् (बा) जोशी व भूषण धर्माधिकारी यांच्याकडे शाळेला ओला कचरा व सुका कचरा वर्गीकरण करण्यासाठी २४० लिटरचे २ कचरा डबे सुपूर्द केले.रवींद्र जोशी यांनी सुजीत महाजन यांच्या मदतीबाबत आभार मानले. शाळा व्यवस्थापनाने महाजन यांना लेखी पत्र देत आमच्या अडचणीचे ताबडतोब निर्णय घेऊन आम्हाला मोठी व छान उत्तम प्रतीचे डबे उपलब्ध करून दिल्या बद्दल आभार मानले.





0 Comments: