तू पत्रकार, प्रहार कर..!!
तू आहेस खरा पत्रकार तर
शब्दलेखणीने प्रहार कर
मती भ्रष्ट झालेल्या जनांच्या
मनावर तू शब्दांचा वार कर
भिऊ नकोस शब्द लेखणीत
अदृश्य समशेराची धार आहे
राजकीय लोकशाहीत तूच
भ्रष्ट नेत्यांचाकर्दनकाळ आहे
समाजाच्या हितासाठी अरे
लेखणीचा तसा पत्रकार हो
देशाचे भविष्य घडविणारा
असा तू लेखणी सम्राट हो...!
कवी / पत्रकार - सुभाष पटनाईक





0 Comments: