शालेय फी सक्तीने वसूल करणाऱ्या हॉली एंजल्स शाळेवर मनसेचा मोर्चा
डोंबिवली ( शंकर जाधव ) लॉकडाऊन मध्ये बेरोजगारी वाढली असताना दुसरीकडे शाळेने फी भरण्यास सक्ती केली आहे. पालकवर्ग शाळेची फी भरण्यास तयार आहे परंतु फी मध्येसवलत द्यावी अशी मागणी पालकवर्गानी शाळा व्यवस्थापनाकडे केली होती.शाळा व्यवस्थापनाने पालकवर्गाच्या या मागणीकडे लक्ष दिले नसल्याने पालकांनी मनसेकडे आपली व्यथा मांडली.मनसे कामगार सेनेचे कल्याण-डोंबिवली शहर अध्यक्ष मनोज घरत यांची भेट घेऊन आपले म्हणणे मांडले.घरत यांनी यासंदर्भात डोंबिवली पूर्वेकडील हॉली एंजल्स शाळा व्यवस्थापनाची भेट घेण्याचा प्रयत्न केला.मात्र शाळा व्यवस्थापनाने घरत यांची भेट घेण्यास तयार नव्हते.शाळेची फी सक्ती भरण्यास पालकवर्ग तयार नाही म्हणून मनसेच्या वतीने शनिवारी सकाळी साडे दहा वाजता डोंबिवली पूर्वेकडील गांधीनगर येथील पी.एड.टी.कॉलिनीच्या चौकात मोर्चा काढण्यात येणार आहे.मनसेच्या मोर्च्यात पालकवर्ग सहभागी होणार आहे.




0 Comments: