नरडवे धरणग्रस्तांना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आश्वासन

नरडवे धरणग्रस्तांना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आश्वासन

 नरडवे धरणग्रस्तांना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आश्वासन 

  नरडवे धरणग्रस्त समन्वय समिती मुंबई च्या पदाधिकारी यांनी ठाण्याचे माननीय आमदार रवींद्र फाटक  यांच्या समवेत जाऊन मंत्रालयात पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी भेट घेतली. 

        नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार 

पालक मंत्री उदय सामंत साहेब यांच्याशीं काल संध्याकाळी 5 च्या दरम्यान भेट झाली,  ती भेट घेतल्यानंतर विषय मांडले . आठवणी करिता त्यांना सोबत मागण्यांचे निवेदन दिले. ज्या विषयावर 14 डिसेंबरच्या मीटिंगमध्ये ठरलेलं होते, की ज्याप्रमाणे शेतजमीनसाठी 65 टक्के रक्कम ज्यांनी भरलेली नाही त्यांच्याकडून भरून घेणे व पर्यायी शेत जमीन मिळणे याबाबत तसेच 234 वाढीव कुटुंबांचा प्रस्ताव करणे, तसेच वाढीव घरांचे प्रस्ताव व इतर  या सगळ्या विषयावर चर्चा झाली. 

      ग्रामपंचायतचे 18 तारखेच्या अगोदर इलेक्शन असल्याने  18 तारखेला रिझल्ट आहे.  अठरा तारीख नंतर  म्हणजे साधारण 21,  ते 23 जानेवारी पर्यंत पुन्हा आपल्याशी मीटिंग करणार आहेत, त्यात पुनर्वसन मंत्री वडेट्टीवारसाहेब आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब यांच्याशी चर्चा करून वरील प्रस्ताव पास करण्यासाठी एकत्रित बैठक घेऊन त्या विषयावर प्रश्न सोडविण्याचा आपण निश्चित प्रयत्न केला जाईल असे पालकमंत्री यांनी आश्वासन दिले

      ही मीटिंग पार पडल्यानंतर एकनाथ शिंदे साहेब यांच्या शासकीय बंगल्यावर रात्री 9 वाजता मीटिंग झाली, व त्या बाबत त्यांना ही माहिती दिली.

     मंत्रालयातील पालकमंत्री उदय सामंत यांच्या दालनात अर्धा तासभर चर्चा झाली. त्यामध्ये आदरणीय आमदार रवींद्र फाटक साहेब, मुंबई समितीचे सचिव मधुकर पालव, अध्यक्ष सुरेश सहदेव ढवळ, कवी संतोष सावंत, व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

0 Comments: